जनता विद्यालय सिटी ब्रँच बल्लारपूर येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा
ज्योत्स्ना वानखेडे:
जनता विद्यालय सिटी ब्रँच बल्लारपूर येथे दि. २८ फेब्रुवारी 2026 ला महान शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रमण यांचा जन्मदिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणुन साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम मुख्याध्यापिका सी. व्ही. धकाते यांनी डॉ. सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलन व माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
त्यानंतर पाळी प्रमुख पी. डब्ल्यू. मत्ते यांनी डॉ. सी. व्ही. रमण यांचे जीवन कार्य तथा वैज्ञानिक प्रयोगाचे महत्त्व याविषयी माहिती दिली.
यानंतर मुख्याध्यापिका सी. व्ही. धकाते यांनी
डॉ. सी. व्ही. रमण यांनी केलेले संशोधन कार्य व दैनंदिन जीवनातील विज्ञानाचे महत्त्व यावर विस्तृत मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांना शाळेतील प्रयोगशाळा दाखवण्यात आली व प्रयोगशाळेतील साहित्यांची ओळख करून देण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.