Wednesday, July 29, 2026
spot_img
HomeChandrapurजिल्हाधिका-यांच्या हस्ते शासकीय योजनांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

जिल्हाधिका-यांच्या हस्ते शासकीय योजनांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

जिल्हाधिका-यांच्या हस्ते शासकीय योजनांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

Ø तहसील कार्यालय, चंद्रपूर येथे 6, 7 आणि 8 मार्च पर्यंत आयोजन

चंद्रपूर( जीमाका): जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने तहसील कार्यालय, चंद्रपूर येथे कल्याणकारी शासकीय योजनांच्या छायाचित्र प्रदर्शानाचे उद्घाटन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या हस्ते आज (दि.6) करण्यात आले. यावेळी चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, तहसीलदार विजय पवार, सहायक आयुक्त समाजकल्याण विनोद मोहतुरे, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, नायब तहसीलदार ओंकार ठाकरे, राजू धांडे आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने शासकीय योजनांची माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविण्यात येत आहे. योजनांची माहिती, त्याचे निकष, अटी व शर्ती आदी बाबी प्रदर्शनामध्ये लावण्यात आल्या आहेत. 7 मार्च पासून जिल्ह्यातील महसूली मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान राबविण्यात येत आहे. महाराजस्व अभियानादरम्यान सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी आपल्या संपूर्ण क्षमतेने काम करून नागरिकांना योजनांचा लाभ द्यावा. तसेच चंद्रपूर तहसील कार्यालय येथे आयोजित तीन दिवसीय प्रदर्शनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
सुरवातीला फित कापून जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी प्रदर्शनाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी डीजीटल चित्ररथाचे सुध्दा उद्घाटन केले. तहसील कार्यालय चंद्रपूर येथे 6, 7 आणि 8 मार्च 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत छायाचित्र प्रदर्शन नागरिकांसाठी खुले राहणार आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page