Wednesday, May 6, 2026
HomeEducationबल्लारपूर सेवा समिती बल्लारपूर द्वारा संचालित मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ...
spot_img

बल्लारपूर सेवा समिती बल्लारपूर द्वारा संचालित मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर एच. एस. सी. बोर्ड परीक्षा 2025 निकाल जाहीर

बल्लारपूर सेवा समिती बल्लारपूर द्वारा संचालित मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर एच. एस. सी. बोर्ड परीक्षा 2025 निकाल जाहीर

श्रेयश वानखेडे:
इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात बारावीच्या मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथील विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादित केले. यात कला विभागातून एकूण 24 विद्यार्थिनी परीक्षेसाठी बसल्या होत्या त्यात एकूण 21 विद्यार्थिनी पास झाले असून कला विभागाचा निकाल 87.50% लागला. त्यात प्रथम क्रमांक लजिना खान(73.17%), द्वितीय राणी वर्मा (70.83)क्रमांक हिने पटकाविला. तर  वाणिज्य विभागाचा निकाल 76.92% लागला.त्यात वाणिज्य विभागातून 39 विद्यार्थिनी परीक्षेस बसल्या होत्या त्यात 30 विद्यार्थिनी पास झाल्या, त्यात प्रथम क्रमांक  निशा वर्मा (61.50),द्वितीय क्रमांक संजना दास(55.83). व विज्ञान विभागाचा निकाल 94 % लागला. त्यात विज्ञान विभागातून50 विद्यार्थिनी बसल्या होत्या त्यात 47 विद्यार्थिनी पास झाल्या. त्यात प्रथम क्रमांक मौर्वी सदाला (78%), द्वितीय क्रमांक ईशा मिश्रा(75.50) यांनी पटकाविला. या यशाबद्दल बल्लारपूर सेवा समिती बल्लारपूर चे संस्थापक श्री.जैनुद्दीन जव्हेरी सर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. तसेच  शाळेच्या प्राचार्या असमा खान खलीदी मॅडम व सर्व शिक्षक  व शिक्षिका वृंद तथा शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीकरिता खूप खूप शुभेच्छा दिल्या.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page