Thursday, June 4, 2026
HomeChandrapurश्रीरामनवमी निमित्त गिरनार चौकात भव्य स्वागत सोहळा व आकर्षक फायर शो
spot_img

श्रीरामनवमी निमित्त गिरनार चौकात भव्य स्वागत सोहळा व आकर्षक फायर शो

श्रीरामनवमी निमित्त गिरनार चौकात भव्य स्वागत सोहळा व आकर्षक फायर शो

Jyotsna Wankhede : श्रीरामनवमीच्या पावन आणि मंगलमय उत्सवानिमित्त दिनांक २६ मार्च रोजी चंद्रपूर शहरातून निघणाऱ्या भव्य शोभायात्रेच्या स्वागतासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार व मुनगंटीवार परिवारातर्फे स्थानिक गिरनार चौक येथे भव्य आणि आकर्षक फायर शोचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष उपक्रमामुळे शोभायात्रेच्या स्वागत सोहळ्यात उत्साह आणि दिमाखात अधिक भर पडणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीरामनवमी उत्सवानिमित्त शहरात धार्मिक आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून हजारो भाविक नागरिक मोठ्या श्रद्धेने शोभायात्रेत सहभागी होतात. या पार्श्वभूमीवर भाविकांच्या स्वागतासाठी आणि उत्सवाचे पावित्र्य अधिक वृद्धिंगत करण्यासाठी हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

शोभायात्रेत सहभागी होणाऱ्या भाविक नागरिकांसाठी मुनगंटीवार परिवारातर्फे ‘फ्रुटी’ या शीतपेयाचे  वितरण करण्यात येणार आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर भाविकांची सोय व्हावी या सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार व सौ. सपना मुनगंटीवार शोभायात्रेत सहभागी होत प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करणार आहेत. श्रीरामांच्या आदर्श विचारांचे स्मरण आणि धार्मिक परंपरांचा सन्मान राखत भक्तिभावाने हा सोहळा साजरा करण्यात येणार आहे.
गिरनार चौक येथे आयोजित फायर शो हा शोभायात्रेचा प्रमुख आकर्षण ठरणार असून, आकर्षक रोषणाई, उत्साहवर्धक वातावरण आणि भक्तिरसाने ओतप्रोत भरलेला हा सोहळा नागरिकांसाठी संस्मरणीय ठरणार आहे.
शहरातील नागरिकांनी व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भव्य स्वागत सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page