Wednesday, June 3, 2026
HomeKorpanaसहकारातून समृद्धीकडे... नवी पावले, नवा विश्वास!
spot_img

सहकारातून समृद्धीकडे… नवी पावले, नवा विश्वास!

सहकारातून समृद्धीकडे… नवी पावले, नवा विश्वास! 

ज्योत्स्ना वानखेडे:
आज कोरपना येथे ‘चंद्रपूर जिल्हा देखरेख सहकारी संस्था मर्यादित, चंद्रपूर’ च्या नवीन शाखेचा भव्य उद्घाटन समारंभ अत्यंत उत्साहात संपन्न झाला. सहकार क्षेत्रातील जनसामान्यांच्या विश्वासाचे प्रतीक असलेल्या या संस्थेची सेवा आता कोरपना तालुक्यातील जनतेसाठी सज्ज झाली आहे. याप्रसंगी दीपप्रज्वलन आणि फित कापून शाखेचे अधिकृत उद्घाटन करण्याचे भाग्य मला लाभले. सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास साधणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. विजयरावजी बावणे साहेब (संचालक, CDCC बँक, चंद्रपूर) हे उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. ठाकूर साहेब (जिल्हा उपनिबंधक, चंद्रपूर), मा. श्री. काळे साहेब (CEO, जिल्हा देखरेख सहकारी संस्था, चंद्रपूर), मा.श्री.अशोकजी बावणे (सभापती APMC कोरपना)यांची सन्माननीय उपस्थिती लाभली.
यासोबतच कोरपना, राजुरा व जिवती तालुक्यातील समस्त गटसचिव, सर्व सेवा सहकारी संस्थांचे अध्यक्ष आणि सहकार क्षेत्रातील सर्व स्नेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही नवीन शाखा कोरपना परिसरातील शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या प्रगतीसाठी एक महत्त्वाचे केंद्र ठरेल, असा मला विश्वास आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page