Monday, September 14, 2026
spot_img
HomeChandrapurजिल्हा सामान्य रुग्णालयात ‘स्किझोफ्रेनिया नातेवाईक गट’ चे उद्घाटन

जिल्हा सामान्य रुग्णालयात ‘स्किझोफ्रेनिया नातेवाईक गट’ चे उद्घाटन

जिल्हा सामान्य रुग्णालयात ‘स्किझोफ्रेनिया नातेवाईक गट’  चे उद्घाटन

चंद्रपूर( जीमाका): जागतिक स्किझोफ्रेनिया दिनानिमित्त कर्मवीर मा. सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मानसिक आजारग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांसाठी  ‘स्किझोफ्रेनिया नातेवाईक गट’  या सहायता व जनजागृती उपक्रमाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी अधिष्ठाता डॉ. शरद कुचेवार होते. यावेळी मनोविकृतीशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. सायली दाबेराव, मानसिक रोग वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप भटकर तसेच डॉ. प्रियंका मून यांनी उपस्थित रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांना स्किझोफ्रेनिया या मानसिक आजाराविषयी सविस्तर माहिती दिली. यात आजाराची लक्षणे, उपचारांचे महत्त्व, पुनर्वसन तसेच समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती करण्यात आली. तसेच मानसिक आजाराशी संबंधित अडचणी, अनुभव व समस्या मोकळेपणाने मांडण्यासाठी आणि परस्पर सहाय्य मिळविण्यासाठी ‘स्किझोफ्रेनिया नातेवाईक गट’ च्या माध्यमातून बोलते व्हा, असे आवाहन उपस्थितांना करण्यात आले.
सदर कार्यक्रम मनोविकृतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. यावेळी डॉ. मयूर, डॉ. धनेंधर, डॉ. आसावरी, डॉ. श्रद्धा, डॉ. विशाल चौखे आणि छात्रमानसचे अमोल मेश्राम यांच्यासह मेट्रन श्रीमती कोटांगले, श्रीमती आत्राम, सर्व वॉर्ड इन्चार्ज सिस्टर्स, समाजसेवा विभागाचे अधिकारी व कर्मचारी, विभागाच्या श्रीमती रामटेके, अधिपरिचारिका व इतर कर्मचारी उपस्थित होते. आयोजनासाठी डॉ. सायली दाबेराव व समाजसेवा अधीक्षक उमेश आडे यांनी सहकार्य केले.
या उपक्रमामुळे मानसिक आजाराविषयी जागरूकता वाढण्यास तसेच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आधाराचे व्यासपीठ उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page