Wednesday, July 29, 2026
spot_img
HomeNagpurआकस्मिक बैठकीत एका प्रकरणास "ऑन द स्पॉट" मान्यता

आकस्मिक बैठकीत एका प्रकरणास “ऑन द स्पॉट” मान्यता

आकस्मिक बैठकीत एका प्रकरणास “ऑन द स्पॉट” मान्यता

ज्योत्स्ना वानखेडे:
दिनांक : 21/04/2026 रोजी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नागपूर यांच्या कार्यालयात बैठक घेतली. यावेळी मार्च महिन्याच्या वेतनाबाबत चर्चा करून शिक्षण संचालक (माध्यमिक) व एनआयसी पुणे कार्यालयातील अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधून वेतनाबाबत येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या सूचना दिल्या.
नागपूर जिल्ह्यातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी समायोजन केल्यानंतर बीएलओ व जनगणना कामकाजाबाबत मा. जिल्हाधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून यावर उपाययोजना करण्याबाबत मागणी केली. यावर जिल्हाधिकारी यांनी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्याशी चर्चा करून प्रश्न निकाली काढण्यात येईल, असे सांगितले.
तसेच कार्यालयात प्रलंबित शालार्थ आयडी, अतिरिक्त शिक्षक, संचमान्यता, पेन्शन केस व अन्य महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी अनेक दिवसांपासून कार्यालयात प्रलंबित असलेले पर्यवेक्षक प्रस्ताव “ऑन द स्पॉट” निकाली काढण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार श्री. निळकंठ उईके (जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, खापा, ता. सावनेर, जिल्हा नागपूर) यांना पर्यवेक्षक पदाच्या मान्यतेचे पत्र “ऑन द स्पॉट” देण्यात आले.
तसेच प्राथमिक विभागातील समस्यांबाबत प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्यासोबत चर्चा केली.
बैठकीला शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्री. दहिफळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. नीलेश गुंड, वेतन पथक अधीक्षक (माध्यमिक) शेखर पाटील, नागपूर जिल्हाध्यक्ष अनिल गोतमारे, जिल्हा कार्याध्यक्ष विजय गोमकर, लक्ष्मीकांत व्होरा, निलेश खोरगडे, रवींद्र बिजवे, मिलिंद वानखेडे, खिमेश बढीये, सपन नेहरोत्रा, श्री. नागापुरे, भारत रेहपाडे, नामदेव मोरे व शिक्षक – कर्मचारी उपस्‍थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page