Thursday, April 23, 2026
HomeParbhaniमा. नगराध्यक्ष विनोद बोराडे यांचे चिरंजीव प्रतीक बोराडे यांचा विवाह अतिशय...
spot_img

मा. नगराध्यक्ष विनोद बोराडे यांचे चिरंजीव प्रतीक बोराडे यांचा विवाह अतिशय शाही थाटात संपन्न.

मा. नगराध्यक्ष विनोद बोराडे यांचे चिरंजीव  प्रतीक बोराडे यांचा विवाह अतिशय शाही थाटात संपन्न.

श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या प्रतिकृती मुळे विवाह सोहळा ठरला अविस्मरणीय.

ज्योत्स्ना वानखेडे: भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांचे चिरंजीव प्रतीक बोराडे यांचे लग्न अतिशय उत्साहात आणि शाही थाटात संपन्न झाले.या लग्नाची चर्चा सध्या संपूर्ण परभणी जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात सुरू झाली आहे हा शाही विवाह सोहळा सेलू येथील बाहेती मंगल कार्यालय येथील मोकळ्या जागेत भव्य दिव्य श्रीराम जन्मभूमी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली होती त्यामुळे सेलुकरांसह संपूर्ण मराठवाड्यातील लग्नासाठी आवर्जून उपस्थित असणाऱ्या सर्वांसाठी हा विवाह सोहळा अविस्मरणीय ठरला आहे. सेलू चे मा. नगराध्यक्ष विनोद बोराडे यांचे चिरंजीव  प्रतीक यांचा विवाह सोहळा मंगळवार दिनांक 21 एप्रिल रोजी सेलू येथे मोठ्या थाटामाटा संपन्न झाला. या विवाहाची तयारी मागील एक महिन्या पासून सुरू होती. या विवाहा करीता बोराडे परिवाराच्या वतीने संपूर्ण सेलू तालुक्यासह मराठवाड्यात  निमंत्रण पत्रिका पाठविण्यात आल्या होत्या. लग्नाच्या एक दिवस अगोदर सेलू शहर आणि परिसरातील नागरिकांना पंचपक्वानाची मेजवानी दिली जात होती. या विवाहाकरीता परभणी जिल्ह्याचे खासदार संजय जाधव,परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. मेघना बोर्डीकर यांच्या मातोश्री सौ. मीनाताई बोर्डीकर,माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, माजी मंत्री राजेश टोपे, आ. डॉ. राहुल पाटील,मा. आ. विजय भांबळे यांच्यासह शासकीय अधिकारी, परभणी जिल्ह्यातील  विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. ज्या ठिकाणी प्रतिक व ऐश्वर्या यांचा विवाह सोहळा संपन्न झाला ते श्रीराम जन्मभूमी मंदिराची प्रतिकृती तयार करण्याकरीता मुंबई येथून आलेल्या कारागीरांनी अतिशय सुंदर व देखणे असे श्रीराम मंदिर उभारले होते. या श्रीराम मंदिराचा देखावा तसेच शाही विवाह सोहळ्याची चर्चा पुढील काही महिने सुरूच राहणार आहे. खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मुकेशराव बोराडे मा. नगराध्यक्ष विनोदराव बोराडे, नगरपरिषदेचे उपाध्यक्ष साईराज बोराडे व बोराडे परिवाराच्या सदस्यासह निकटवर्तीय व मित्र मंडळ गेल्या काही महिन्यां पासून  अहोरात्र परिश्रम करत होते.त्यांच्या या प्रयत्नांनी पार पडलेला शाही विवाह सोहळा कायम सेलूकारांच्या लक्षात राहणारा अविस्मरणीय ठरला आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page