Saturday, April 25, 2026
HomeParbhaniरा.ब.गिल्डा सभागृहाचा नूतनीकरण उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
spot_img

रा.ब.गिल्डा सभागृहाचा नूतनीकरण उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.

रा.ब.गिल्डा सभागृहाचा नूतनीकरण उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.

ज्योत्स्ना वानखेडे: सेलू येथील नूतन विद्यालयातून १९७२ ला दहावी उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या आर्थिक योगदान,सामुहिक गुरू दक्षिणेतून नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या पुढाकारातून नूतनीकरण झालेल्या कै.रा.ब. गिल्डा सभागृहाचे उद्घाटन शुक्रवार (दि.२४) रोजी १९७२ चे माजी विद्यार्थी माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर, श्याम मणियार,उद्योजक रामप्रसाद घोडके,प्रा.भगवान टेकाळे, डॉ. सुभाष परतानी, शेतीनिष्ठ शेतकरी पांडुरंग मगर, शरयू मुळावेकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया हे होते. तर व्यासपीठावर सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, महिला मंडळाच्या सचिव ललिता गिल्डा यांची उपस्थिती होती. नूतन विद्यालयाच्या कै.रा.ब.गिल्डा सभागृहाचा नूतनीकरण उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला. प्रास्ताविक सहसचिव जयप्रकाश बिहाणी यांनी केले. सुत्रसंचलन अशोक लिंबेकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक संतोष पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थी,विद्यमान प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात नूतन विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page