Wednesday, May 6, 2026
HomeElectionपश्चिम बंगाल, आसाम व पुद्दूचेरी राज्यातील विधानसभा निवडणुकांतील भाजपा महायुतीच्या दणदणीत विजयाने...
spot_img

पश्चिम बंगाल, आसाम व पुद्दूचेरी राज्यातील विधानसभा निवडणुकांतील भाजपा महायुतीच्या दणदणीत विजयाने चंद्रपुरात जल्लोष

पश्चिम बंगाल, आसाम व पुद्दूचेरी राज्यातील विधानसभा निवडणुकांतील भाजपा महायुतीच्या दणदणीत विजयाने चंद्रपुरात जल्लोष

गिरनार चौक भगवामय; फटाक्यांची आतषबाजी, पेढे वाटप आणि जोरदार घोषणाबाजी

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून विजय उत्सव साजरा



Jyotsna Wankhede: पश्चिम बंगाल, आसाम व पुद्दूचेरी येथे पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपा महायुतीने मिळविलेल्या ऐतिहासिक आणि दणदणीत विजयाचा आनंद चंद्रपूर शहरात उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार शहरातील गिरनार चौक येथे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र येत विजयाचा जल्लोष केला. संपूर्ण परिसर “भारत माता की जय”, “जय श्रीराम” आणि भाजपाच्या घोषणांनी दुमदुमून गेला.

यावेळी फटाक्यांची भव्य आतषबाजी करण्यात आली तसेच नागरिकांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी जल्लोष करत भाजपा महायुतीच्या विजयाचा आनंद व्यक्त केला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर संगीताताई खांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा विजय उत्सव पार पडला.

जनतेने विकास, सुशासन, राष्ट्रवाद आणि देशगौरवाचे प्रतीक ठरलेल्या देशगौरव पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करत भाजपा महायुतीला भरघोस समर्थन दिल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. पश्चिम बंगाल, आसाम व पुद्दूचेरी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपा महायुतीने नोंदविलेल्या अभूतपूर्व विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. विकासाभिमुख विचार, राष्ट्रहित आणि सक्षम नेतृत्वाला जनतेने दिलेल्या कौलाचा आनंद कार्यकर्त्यांनी जल्लोषातून व्यक्त केला. फटाक्यांची दणदणीत आतषबाजी, जोरदार घोषणाबाजी आणि पेढे वाटपामुळे गिरनार चौक परिसर भगवामय झाला असून, संपूर्ण वातावरण विजयाच्या उत्साहाने भारावून गेले होते.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page