Monday, May 18, 2026
Homeबल्लारपूरबल्लारपूर प्रभाग क्रमांक १० मधील भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत तात्काळ कार्यवाही करण्याबाबत निवेदन.
spot_img

बल्लारपूर प्रभाग क्रमांक १० मधील भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत तात्काळ कार्यवाही करण्याबाबत निवेदन.

बल्लारपूर प्रभाग क्रमांक १० मधील भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत तात्काळ कार्यवाही करण्याबाबत निवेदन.

ज्योत्स्ना वानखेडे:
नगर परिषद बल्लारपूर अंतर्गत प्रभाग क्रमांक १० मध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिक अत्यंत त्रस्त झाले आहेत. परिसरातील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वेळा कुत्र्यांनी नागरिकांच्या मागे धावणे तसेच हल्ला करण्याच्या घटना देखील घडत आहेत.
या गंभीर समस्येबाबत अनेक वेळा लक्ष वेधण्यात आले आहे, मात्र अद्याप कोणतीही योग्य कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
प्रभाग क्रमांक १० मधील भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. याकरिता मा. मुख्याधिकारी साहेब, नगर परिषद बल्लारपुर यांना निवेदन देण्यात आले.
 या गंभीर समस्या न सोडवल्यास प्रशासनाचा विरोधात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी व प्रभागातील नागरिकाँ द्वारे आंदोलन करण्यात येईल.
निवेदन देण्याकरिता प्रभाग क्र. १० चे नगर सेवक सुमित (गोलू) डोहने, युवा नेता समाजिक कार्यकर्ता शाहिद शेख, रितेश अलोने, शुभम लभाने उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page