Sunday, May 24, 2026
HomeChandrapurचंद्रपूरात स्थानिक गुन्हे शाखे द्वारे प्रतिबंदीत सुंगधी तंबाखूच्या मोठा साठा जप्त, मुख्य...
spot_img

चंद्रपूरात स्थानिक गुन्हे शाखे द्वारे प्रतिबंदीत सुंगधी तंबाखूच्या मोठा साठा जप्त, मुख्य आरोपी वसीम रिझवी फरार

चंद्रपूरात स्थानिक गुन्हे शाखे द्वारे प्रतिबंदीत सुंगधी तंबाखूच्या मोठा साठा जप्त, मुख्य आरोपी वसीम रिझवी फरार

ज्योत्स्ना वानखेडे:

स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरच्या पथकाने रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील राजीव गांधी नगर परिसरात छापा टाकून प्रतिबंधित सुगंधी तंबाखूच्या मोठा साठा जप्त केला आहे या कार्यवाहीत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी फरार आहे याप्रकरणी सिद्धांत माधव गोंडाणे ( 32 )मोहम्मद अखिल शकील शेख( 45) दोन्ही राहणार इंदिरानगर चंद्रपूर यांना पोलिसांनी अटक केली आहे तर मुख्य आरोपी वसीम रिझवी (40 )राहणार घुटकाळा वार्ड चंद्रपूर हा फरार असून त्याच्या शोध सुरू आहे वसीम रिझवी हा मागील अनेक वर्षांपासून सुंगधीत  तंबाखु चा काळा बाजार व तस्करी करतो त्याचे जाळे पूर्ण विदर्भ भर पसरले असल्याचे सांगितले जाते सदर आरोपी विरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे कारवाही दरम्यान पोलिसांनी ओला हुका शीशा कंपनीचे  140 नग २०० ग्राम वजनाचे प्रतिबंधित सुगंधी तंबाखू किंमत 37100 रुपये ईगल हक्ककाशी कंपनीचे 72 नग  200 ग्रॅम वजनाचे तंबाखू किंमत 29,880 रुपये तसेच 33 किलो सुगंधी तंबाखू किंमत 38 455 रुपये असा एकूण 1 लाख 35 हजार 455 रुपयाच्या मुद्देमाल जप्त केला सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सुनील गोरकार विनोद भुरले पो,हवालदार सुभाष गोहकार ,सतीश अवथरे पोलीस हवालदार रजनीकांत पुटाटावार पोलीस हवालदार दीपक डोंगरे, इमरान खान ,हिरालाल गुप्ता ,किशोर वाकाटे ,शशांक बदामवार यांनी केले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page