Sunday, May 24, 2026
HomePolice*डेली नीड्सच्या दुकानात अवैध दारूची विक्री, पोलिसांची कारवाई, दुकानदारावर गुन्हा दाखल*
spot_img

*डेली नीड्सच्या दुकानात अवैध दारूची विक्री, पोलिसांची कारवाई, दुकानदारावर गुन्हा दाखल*

*डेली नीड्सच्या दुकानात अवैध दारूची विक्री, पोलिसांची कारवाई, दुकानदारावर गुन्हा दाखल*

*ज्योत्स्ना वानखेडे* 
  बल्लारपूर मुख्य मार्गावर असलेल्या “डेली नीड्स” नावाच्या दुकानात देशी दारू बेकायदेशीरपणे विकली जात होती. ग्राहकांना तिथेच बसून पिण्याची सोयही करून दिली जात होती. याप्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी दुकानदारावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला असता, दुकानाबाहेर ग्राहक दारू पीत असल्याचे दिसून आले. पोलिसांना पाहताच ग्राहक पळून गेले. झडतीत काउंटरखाली विक्रीसाठी ठेवलेल्या 25 पाऊच रॉकेट संत्रा देशी दारू, 2 लोखंडी टेबल, बेंच, स्टूल आणि अर्धी भरलेली विदेशी दारूची बाटलीसह एकूण सुमारे 700 रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला.
– *पोलिस चौकीसमोरही अवैध विक्री सुरू*
  बस्ती विभागातील पोलिस चौकीसमोरच असलेल्या एका किराणा व डेली नीड्सच्या दुकानात वर्षांपासून अवैध दारू विक्री होत असल्याची चर्चा आहे. पोलिस विभागाने संबंधित विक्रेत्यावर विशेष मोहीम राबवली होती.
– *स्थानिकांची नाराजी*
  या दुकानदारावर यापूर्वीही अनेकदा कारवाई झाली होती आणि त्याला तडीपारही करण्यात आले होते. तरीही त्याचे नातेवाईक आता पुन्हा अवैध दारू विक्री करत असल्याचे समोर आले आहे. स्थानिकांमध्ये चर्चा आहे की आबकारी विभागाला याची माहिती नाही की ते जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे.
नवीन पोलिस अधीक्षक पदभार स्वीकारल्यानंतर या प्रकरणात काही ठोस बदल होतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page