स्वतंत्राच्या लढाई सारखी, ओबीसींनी आक्रमक पने ओबीसी जनगणनेसाठी लढा उभारा.. सचिन राजूरकर
ज्योत्स्ना वानखेडे:
शेतकरी भवन वरोरा येथे राष्ट्रिय ओबीसी महासंघ विजा भज , विमाप्र , अनुसूचीत जाती जमातीतिची सहविचार सभा येथे सपन्न झाली, 28 जून ला महामोर्चाचे आयोजन चंद्रपूर येथे करण्यात आले आहे. ठरल्या प्रमाणे ओबीसींची जातिनिहाय जनगणना करण्यात यावी. केंद्र सरकारने कॅबिनेट मीटिंग मध्ये जाहीर केले होते की सन 2026 पासून सुरू होणाऱ्या जनगणनेत ओबीसीची जातनिहाय जनगणना करू, मात्र सुरु झालेल्या घरगणना पत्रकात एकूण 33 प्रश्न असून 12 नंबरच्या प्रश्ना मध्ये अनु. जाती/अनु जमाती व इतर अन्य असा उल्लेख असून ओबीसी साठी स्वतंत्र कॉलम दिला नाही. हा ओबीसी समाजाला धोका दिला आहे.यामुळे ओबीसी समाजात सरकार विरोधात तीव्र असंतोष पसरला आहे. जनगणना पत्रकात ओबीसी चा कॉलम नाही तोपर्यंत जनगणनेत ओबीसी समाजाचा सहभाग नाही. त्या करीता स्वातंत्र्य लढाई सारखी ओबिसिंनी जनगणने साठी लढाई लढावी लागेल असे आपल्या भाषणात बोलताना सचिन राजूरकर महासचिव राष्ट्रीय ओबीसी महासंघ यांनी व्यक्त केले.तसेच 14 मे 2026 ला महाराष्ट्र सरकारने कॅबिनेट मंत्रिमंडळात घेतलेला निर्णय बहुजन समाजातील विद्यार्थांना घातक असून या साठी सुध्दा सरकारच्या विरोधात सर्व समाजाने तीव्र लढा द्यावा लागेल, त्या करीता सर्वांनी 28 जून च्या ला होणाऱ्या गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथील महामोर्च्यात बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन पप्पूभाऊ देशमुख नगरसेवक चंद्रपूर यांनी केले या वेळी क्रिष्णा मसराम
जिल्हाध्यक्ष आदिवासी विकास परीषद चंद्रपूर , विलास टिपले माजी नगराध्यक्ष न. प. वरोरा यांनी बहुजन समाजाने असा अन्यायी निर्णयाचे विरोधात तीव्र लढा दिला पाहिजे व चंद्रपूर ला होणाऱ्या मोर्च्यात वरोरा तालुक्यातून जास्तीत जास्त लोकांना सहभागी असे ते म्हणाले.
सौ अर्चना ठाकरे नगराध्यक्ष वरोरा, जयदीप रोडे, सामाजिक कार्यकर्ते,सुधाकर काकडे सामजिक कार्यकर्ते, नितीन मत्ते जिल्हाप्रमुख शिवसेना, पुरुषोत्तम पावडेअध्यक्ष सरपंच संघटना वरोरा, राजू चिकटे सरपंच चारगाव, इत्यादी मान्यवरांची सभेत शासनाच्या अन्यायी निर्णया बद्दल मार्गदर्शन केले, होणाऱ्या चंद्रपूर येथील मोर्चात बहुसंख्य वरोरा बांधव सहभागी होणार व संपूर्ण वरोरा तालुक्यात ओबीसी कॉलम नसेल तर असहकार चळवळ राबविन्याचे ठरले सभेला बरेच नगरसेवक बंडू देऊळकर, अनिल झोटिंग, गजानन जीवतोडे राहुल देवडे, अक्षय ठावरी, मंगला पिंपळकर सरपंच, प्रवीण भोयर, नितिन खंगार, प्रफुल आसुरकर श्री माटे, अनेक सरपंच, उपसरपंच, ग्रा.प.सदस्य, वरील प्रवर्गातील प्रतिष्ठित मान्यवर बहुसंखेनी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्याम लेडे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी महासंघ यांनी केले सूत्रसंचालन किशोर नगराळे व आभार नारायण श्रीरामे यांनी मानले.