Saturday, June 6, 2026
HomeChandrapur*पर्यावरण दिनानिमित्त चांदा फाउंडेशन व रामनगर संघ शाखेतर्फे वृक्षारोपण*
spot_img

*पर्यावरण दिनानिमित्त चांदा फाउंडेशन व रामनगर संघ शाखेतर्फे वृक्षारोपण*

*पर्यावरण दिनानिमित्त चांदा फाउंडेशन व रामनगर संघ शाखेतर्फे वृक्षारोपण*

*ज्योत्स्ना वानखेडे*
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चांदा ईको केअर फाउंडेशन व रामनगर संघ शाखेतर्फे बोकारे प्लॉट परिसरात वृक्षारोपण चा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारोतराव मते, डॉक्टर दाभेरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पर्यावरण विभाग प्रमुख संजयजी दाणेकर प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी माननीय श्री दाणेकर यांनी पर्यावरणचे महत्त्व विशद करतानl म्हटले की प्रत्येकाने आपल्यापासून पर्यावरण रक्षणाच्या कार्याला सुरुवात केली पाहिजे. वृक्ष लावून त्याचे संवर्धन करणे व दैनंदिन जीवनात कमीत कमी प्लास्टिकचा वापर करण्याची आवश्यकता आहे.
डॉक्टर दाबेरे यांनी वाढत्या उष्णतामान बद्दल चिंता व्यक्त करून जास्तीत जास्त वृक्षाची लागवड करण्याची चंद्रपुरात आवश्यकता असल्याचे म्हटले.
कार्यक्रमाचे संचालन चांदा इको केअर फाउंडेशनचे अध्यक्ष श्री विवेक आंबेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव पद्माकर मोरे यांनी केले.
वृक्षारोपण कार्यक्रमाला फाउंडेशनचे कोषाध्यक्ष प्रमोद केळझरकर, श्रीकांत सत्रे, गणपत सत्रे, डॉक्टर अमित मुरके, रामजीवन परमार, अतुल देवतळे, अरविंद बनकर, सतीश पेठे ,प्रदीप देवईकर, आनंद निरंजने, अशोकराव पिंपळकर, मनीष  दुबे, चंद्रकांत  बोरीकर, रितेश  वर्मा, कृष्णा कुकुडकर, राजेश तांबोळी , रंजीत महाजन,  इत्यादी उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page