Friday, June 5, 2026
HomeChandrapurजागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज भव्य महा वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन
spot_img

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज भव्य महा वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज भव्य महा वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन

Jyotsna Wankhede:

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती नागरी समिती, चंद्रपूर यांच्या माध्यमातून राष्ट्रीय पर्यावरण संवर्धन अभियान २०२६ अंतर्गत सोनचाफा  मंदिर, पठाणपुरा गेट जवळ चंद्रपूर येथे भव्य महा वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे माजी मंत्री  आमदार मा. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते होणार असून विविध धर्मांचे धर्मगुरू प्रमुख उपस्थित राहणार आहेत. यामध्ये महाराज  सुधाकर बगडे, फादर सुनील जॉर्ज कुमार, मौलाना फजरुल रहमान खान , भंते मंगल बुद्ध विपसी , ग्यानी लाहोर सिंग जी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. सर्वधर्मीय प्रतिनिधींच्या सहभागातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.

आज वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि पर्यावरणीय असंतुलन ही गंभीर आव्हाने आपल्या समोर उभी आहेत. यावर मात करण्यासाठी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन हा सर्वात प्रभावी उपाय आहे. प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

या महत्त्वपूर्ण पर्यावरणपूरक उपक्रमात चंद्रपूर शहर व परिसरातील नागरिक, सामाजिक संस्था, युवक, महिला, विद्यार्थी तसेच विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वृक्षारोपण अभियान यशस्वी करावे, असे आवाहन पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती नागरी समिती, चंद्रपूर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page