*ज्योत्स्ना वानखेडे*
*प्रकरण:* फायनान्स कंपनीच्या नावाने बनावट कर्ज मंजुरीचे आमिष दाखवून ₹४,४६,२५०/- ची फसवणूक करणाऱ्या आरोपीचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला.
*कसे घडले:*
– तक्रारदार श्री. सचिन सदाशिव चंदनबावणे, वय ३५, रा. मराठा चौक, बाबुपेठ, चंद्रपूर हे हार्वेस्टर मशीन विक्रेते आहेत.
– ग्राहकांच्या माध्यमातून त्यांना “हेमंत जोशी” नावाच्या व्यक्तीचा संपर्क मिळाला. त्याने स्वतःला “पुनावाला फिनकॉर्प लि., नागपूर” चा कर्मचारी सांगितले.
– हार्वेस्टर खरेदीसाठी कर्जाची गरज असलेल्या तक्रारदाराच्या ग्राहकांसाठी हेमंत जोशीने घरी जाऊन खोटे कर्ज एग्रीमेंट केले.
– व्हॉट्सअॅपवर बनावट “Loan Sanction Letter” पाठवून ₹१५ लाख कर्ज मंजूर झाल्याचे भासवले.
– कर्ज रक्कम जमा करण्यासाठी डाऊन पेमेंट म्हणून ₹४,४६,२५०/- “वृषभ इखार, जनरल मॅनेजर, पुनावाला फिनकॉर्प लि.” या नावाच्या SBI खात्यावर जमा करायला सांगितले. खाते क्र: २०२८०८०८१८७, IFSC: SBIN0011419
– १६ मे २०२६ रोजी तक्रारदाराने IMPS द्वारे ही रक्कम ट्रान्सफर केली.
– १८ मे २०२६ रोजी आरोपींनी बनावट कर्ज वितरण व डिलिव्हरी मेल पाठवली, पण १९ मे पासून मोबाईल बंद आला.
– चौकशीअंती पुनावाला फिनकॉर्पमध्ये “हेमंत जोशी” नावाचा कोणी कर्मचारी नसल्याचे व कागदपत्रे पूर्ण बनावट असल्याचे उघड झाले.
*पुढील कारवाई:*
– तक्रारदाराने सायबर हेल्पलाईन १९३० वर ऑनलाइन तक्रार क्र. ३१९०५२६०१०४७०८ नोंदवली.
फिर्यादीच्या तक्रारीवरून चंद्रपूर शहर पोलिसांनी ०३ जून २०२६ रोजी रात्री २३:०८ वाजता आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
*लावलेली कलमे:*
– माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००: कलम ६६(ड) – संगणकीय साधनांचा वापर करून फसवणूक
– भारतीय न्याय संहिता २०२३: कलम ३(५) – समान उद्देशाने केलेली कृती, कलम ३१८(४) – फसवणूक
*तपास व अटक:*
गुन्ह्याचे गांभीर्य पाहून मा. पोलीस अधीक्षकांनी तपास सायबर पोलीस स्टेशनकडे वर्ग केला. तांत्रिक विश्लेषणानंतर अवघ्या काही दिवसात आरोपी *विनोद शांताराम गडाख पाटील, वय ४४ वर्षे, रा. फ्लॅट नं. ११०३, लक्झर को-ऑपरेटिव्ह सोसायटी, मोहन नगर, बाणेर, ता. हवेली, जि. पुणे* याला त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली.
*आरोपीची फसवणूक पद्धत:*
नाशिक, उत्तरप्रदेश, इंदोर, वडोदरा येथेही आरोपीने नावे बदलून – हेमंत जोशी, हेमंत पवार, रणवीर सिंग सिकरवार, राम हरी चंद, मयंक वानखेडे, अभिषेक शर्मा, जितेंद्र श्रीवास्तव, निखील यादव, विठ्ठल पाटील, विनोद पाटील – असे वेगवेगळे नाव वापरून लोकांची फसवणूक केल्याचे तपासात दिसून आले.
*न्यायालयीन कारवाई:*
– आरोपीला ५ दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड मंजूर.
– तपासात भारतीय न्याय संहिता कलम २३८(सी), ३३६(२), ३३८, ३४० वाढ करण्यात आले.
– वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस तपास करत आहेत.
*कामगिरी करणारे पथक:*
पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात, पोलीस निरीक्षक श्री सुनिल गाडे यांच्या नेतृत्वात सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूर व चंद्रपूर शहर पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.
*पोलिसांचे आवाहन:*
– अनोळखी व्यक्तीच्या फोन किंवा व्हॉट्सअॅपवरील कर्ज मंजुरीच्या आमिषाला बळी पडू नका.
– अधिकृत बँक किंवा फायनान्स कंपनीत स्वतः जाऊन खात्री केल्याशिवाय कोणत्याही बँक खात्यावर पैसे ट्रान्सफर करू नका.
– फसवणूक झाल्यास त्वरित राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन *१९३०* वर संपर्क साधा.