Thursday, September 24, 2026
spot_img
HomeFestivalsगणरायाच्या चरणी आमदार किशोर जोरगेवार ‘चंद्रपूरचा राजा’ची महाआरती

गणरायाच्या चरणी आमदार किशोर जोरगेवार ‘चंद्रपूरचा राजा’ची महाआरती

गणरायाच्या चरणी आमदार किशोर जोरगेवार ‘चंद्रपूरचा राजा’ची महाआरती

*Jyotsna Wankhede*: गणेशोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात आमदार किशोर जोरगेवार यांनी शहरातील विविध गणपती मंडळांच्या गणेशमूर्तींचे दर्शन घेत गणरायाचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांनी ‘चंद्रपूरचा राजा’ गणेश मंडळालाही भेट देत बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले तसेच महाआरतीमध्ये सहभागी होत गणरायाची आराधना केली.
गणेशोत्सव हा चंद्रपूरच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे. या उत्सवाच्या माध्यमातून शहरातील विविध भागांमध्ये भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून, गणेश मंडळांकडून विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी शहरातील विविध गणेश मंडळांना भेटी देत गणरायाचे दर्शन घेतले.
चंद्रपूरचा राजा गणेश मंडळाला भेट दिल्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मंडळाच्या पदाधिकार्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर झालेल्या महाआरतीत आमदार जोरगेवार सहभागी झाले. भक्तिमय वातावरणात झालेल्या महाआरतीने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी आमदार जोरगेवार यांनी गणरायाच्या चरणी चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांच्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि प्रगतीसाठी प्रार्थना केली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजात एकोपा, बंधुभाव आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
विविध गणेश मंडळांना भेटी देताना आमदार किशोर जोरगेवार यांनी मंडळांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. गणेशोत्सवाच्या आयोजनाबाबत माहिती घेत मंडळांकडून राबविण्यात येणार्या सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचेही त्यांनी कौतुक केले. उत्सव साजरा करताना सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या सहभागातून विधायक उपक्रम राबविण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page