Saturday, July 4, 2026
HomeMaharashtra*लोहमार्ग पोलीस भरतीतील OBC प्रतीक्षायादी तातडीने जाहीर करा - आ. किशोर जोरगेवार*...
spot_img

*लोहमार्ग पोलीस भरतीतील OBC प्रतीक्षायादी तातडीने जाहीर करा – आ. किशोर जोरगेवार* *मुख्यमंत्री यांची भेट घेत केली मागणी*

*लोहमार्ग पोलीस भरतीतील OBC प्रतीक्षायादी तातडीने जाहीर करा – आ. किशोर जोरगेवार*

*मुख्यमंत्री यांची भेट घेत केली मागणी*

*Jyotsna Wankhede*: मुंबई मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई भरती २०२६ मधील OBC प्रवर्गाची प्रतीक्षायादी (वेटिंग लिस्ट) तातडीने जाहीर करून पात्र उमेदवारांना न्याय देण्याची मागणी केली. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना सविस्तर निवेदन सादर करत संबंधित पोलीस प्रशासनाला आवश्यक निर्देश देण्याची विनंती केली.
आमदार जोरगेवार यांनी निवेदनात म्हटले आहे की, मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई भरती प्रक्रियेत अनेक होतकरू युवक-युवती सहभागी झाले असून अंतिम निकाल लागून जवळपास दोन महिने उलटले तरी OBC प्रवर्गाची प्रतीक्षायादी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे पात्र उमेदवारांमध्ये प्रचंड संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रतीक्षायादी जाहीर न झाल्यामुळे तिच्यासह अनेक गुणवंत उमेदवारांच्या नियुक्तीची प्रक्रिया रखडली असून त्यांच्या भविष्यावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे.
यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की, ग्रामीण भागातील अनेक युवक-युवती अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मेहनत घेऊन पोलीस भरतीची तयारी करतात. अशा परिस्थितीत प्रशासकीय विलंबामुळे त्यांच्या संधी हिरावल्या जाणे अन्यायकारक आहे. त्यामुळे OBC प्रवर्गाची प्रतीक्षायादी तातडीने जाहीर करून पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत संबंधित यंत्रणेला स्पष्ट निर्देश देण्यात यावेत. अशी मागणी त्यांनी सदर निवेदनाच्या माध्यमतून केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार जोरगेवार यांनी मांडलेल्या मागणीची दखल घेत संबंधित विभागाकडून विषयाची माहिती घेऊन योग्य कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केल्याची माहिती आमदार जोरगेवार यांनी दिली.
चंद्रपूरसह राज्यातील पात्र आणि गुणवंत उमेदवारांना न्याय मिळावा, यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचा विश्वासही आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी व्यक्त केला.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page