Saturday, July 4, 2026
HomeMaharashtraआ. सुधीर मुनगंटीवार यांचा विधानसभेतील पाठपुरावा ठरला निर्णायक; तडाळी ग्रोथ सेंटर व...
spot_img

आ. सुधीर मुनगंटीवार यांचा विधानसभेतील पाठपुरावा ठरला निर्णायक; तडाळी ग्रोथ सेंटर व चंद्रपूर एमआयडीसीला ४० कोटींचा निधी

आ. सुधीर मुनगंटीवार यांचा विधानसभेतील पाठपुरावा ठरला निर्णायक; तडाळी ग्रोथ सेंटर व चंद्रपूर एमआयडीसीला ४० कोटींचा निधी

गडचिरोलीतील शेतकऱ्यांशी संवाद, उद्योगांवरील श्वेतपत्रिका आणि चंद्रपूरच्या पायाभूत सुविधांसाठी निधी देण्याचे उद्योगमंत्र्यांचे सभागृहात आश्वासन

गडचिरोलीत शेतकरी, लोकप्रतिनिधी व संबंधित यंत्रणासोबत बैठक; आमदार सुधीर मुनगंटीच्या उपस्थितीत संवाद साधण्याचे उद्योग मंत्राची ग्वाही

*Jyotsna Wankhede*:महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ मधील सुधारणा विधेयकावरील चर्चेदरम्यान राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरच्या औद्योगिक विकासाचा मुद्दा विधानसभेत प्रभावीपणे मांडला. तडाळी ग्रोथ सेंटर आणि चंद्रपूर एमआयडीसीमधील प्रलंबित पायाभूत सुविधांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची ठाम मागणी आ.मुनगंटीवार यांनी केली. त्यांच्या या सातत्यपूर्ण आणि अभ्यासपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सभागृहातच तडाळी ग्रोथ सेंटर व चंद्रपूर एमआयडीसीसाठी ४० कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. यामुळे चंद्रपूरच्या औद्योगिक विकासाला नवी गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील तडाळी ग्रोथ सेंटर आणि चंद्रपूर एमआयडीसीमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सुमारे ८० कोटी रुपयांची आवश्यकता असून त्यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. राज्यासाठी घेतल्या जाणाऱ्या कर्जात विदर्भाचाही समान वाटा असल्याने चंद्रपूर, गडचिरोली, हिंगणघाट यांसारख्या भागांनाही विकासाचा समान लाभ मिळालाच पाहिजे, अशी आ .मुनगंटीवार यांनी जोरदार मागणी केली.

राज्यातील औद्योगिक विकासाचा विभागनिहाय आढावा जनतेसमोर यावा, यासाठी विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या सर्व विभागांतील उद्योग, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीची माहिती देणारी श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची मागणीही आ.मुनगंटीवार केली.

याचबरोबर गडचिरोलीमध्ये उभारण्यात येणाऱ्या मोठ्या औद्योगिक प्रकल्पांसाठी भूसंपादन करताना स्थानिक शेतकऱ्यांशी विश्वासाने संवाद साधावा, त्यांच्या भावना आणि मागण्यांचा आदर करावा, अशी सूचनाही त्यांनी सरकारला केली. विकास आणि लोकविश्वास या दोन्हींचा समतोल राखत उद्योग उभारले गेले पाहिजेत, असे आ.मुनगंटीवार स्पष्ट केले.

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या अभ्यासपूर्ण आणि ठाम मांडणीची दखल घेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सभागृहात महत्त्वपूर्ण आश्वासन दिले. तडाळी ग्रोथ सेंटर आणि चंद्रपूर एमआयडीसीच्या पायाभूत सुविधांसाठी मागणी करण्यात आलेल्या निधीपैकी ४० कोटी रुपये तातडीने उपलब्ध करून देण्यात येतील, अशी घोषणा त्यांनी केली.

तसेच गडचिरोलीतील औद्योगिक प्रकल्पांच्या अनुषंगाने स्थानिक शेतकरी, संबंधित यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी यांच्यासोबत विशेष बैठक आयोजित करण्यात येईल. या बैठकीत आ. सुधीर मुनगंटीवार यांनाही सहभागी करून घेत शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या जातील, असेही उद्योगमंत्र्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय पुढील अधिवेशनापूर्वी राज्यातील उद्योग, सामंजस्य करार (एमओयू), प्रत्यक्ष उभारलेले प्रकल्प आणि निर्माण झालेल्या रोजगारांचा विभागनिहाय तपशील असलेली श्वेतपत्रिका सभागृहात सादर करण्यात येईल, असे आश्वासनही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले.

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरच्या औद्योगिक विकासाला नवी गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, तडाळी ग्रोथ सेंटर, चंद्रपूर एमआयडीसी आणि गडचिरोलीतील औद्योगिक विकासाला या निर्णयांमुळे निश्चितच मोठी चालना मिळणार आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page