*ज्योत्स्ना वानखेडे*
*घटना काय घडली?*
1. *चोरीची तक्रार:* पोलीस स्टेशन, चंद्रपूर शहर येथे दिनांक *04/07/2026* रोजी गुन्हा क्र. *745/2026, कलम 303(2) BNS* नुसार तक्रार दाखल झाली.
फियादी यांनी सरकारी दवाखान्यासमोरील पार्किंगमध्ये लावलेली *MH 34 BT 1880, काळ्या-लालसर रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर* कंपनीची मोटार सायकल, किंमत अंदाजे *30,000 रु.* अज्ञात चोराने चोरून नेली होती.
2. *पोलिसांची कारवाई:* गुन्ह्याचा तपास करताना पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सदर चोरीतील मोटार सायकल *खालील 2 आरोपींकडून जप्त* करण्यात आली:
1. *प्रदिप संजय शेरकुरे*, वय 29 वर्षे, रा. पारधीगुडा, धोपटाळा, ता. कोरपणा, जि. चंद्रपूर
2. *आशिक इब्राहिम शेख*, वय 34 वर्षे, रा. कुरई, ता. वणी, जि. यवतमाळ
*जप्त केलेला मुद्देमाल – एकूण 9 मोटार सायकल, किंमत अंदाजे 4,30,000 रु.*
1. हिरो पॅशन – 35,000
2. होंडा CB SHINE – 30,000
3. हिरो होंडा स्प्लेंडर प्रो AP 01 AA 3076 – 50,000
4. हिरो होंडा स्प्लेंडर प्लस – 30,000
5. हिरो स्प्लेंडर प्लस – 35,000
6. होंडा SP 125 DLX MH 33 AH 5575 – 1,00,000
7. हिरो स्प्लेंडर प्लस MH 34 BT 1880 – 50,000
8. बजाज CT 100 MH 34 BU 5593 – 40,000
9. होंडा CB SHINE MH34 BN 7581 – 60,000
*तपासात काय समजले?*
तपासात आरोपींनी सांगितले की त्यांनी *एकूण 11 मोटार सायकल* चोरी केल्या आहेत.
– त्यापैकी 1 मोटार सायकल 2025 मध्ये शिरपुर, जि. यवतमाळ येथे पोलिसांनी जप्त केली होती.
– 1 मोटार सायकल 2 महिन्यांपूर्वी महाकाली मंदिर येथून चोरीला गेली होती, ती एक्साईज विभाग कोरपणा कडे जप्त आहे.
– अशा प्रकारे 11 पैकी *9 मोटार सायकल* पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
तपासात असेही समजले की या मोटार सायकलींबाबत चंद्रपूर शहर येथे 2 गुन्हे, पो.स्टे. भारी येथे 1 गुन्हा, पो.स्टे. वणी जि. यवतमाळ येथे 1 गुन्हा, पो.स्टे. धंतोली नागपूर येथे 1 गुन्हा, तसेच यातील मोटार सायकलींपैकी एक गाडी करीमनगर राज्य, तेलंगणा या ठिकाणाहून चोरी करून आणल्याचे आरोपीने सांगितले आहे.
नमुद जप्त करण्यात आलेल्या मोटार सायकलचे मूळचे वाहन क्रमांक बदलून खोट्या नंबर प्लेटा लावून विकण्याची आरोपींनी तयारी केली असल्याचे निष्पन्न झाले.
*ही कार्यवाही खालील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात झाली:*
सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी, चंद्रपूर, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद चौगुले यांचे मार्गदर्शनात पो.नि. निशीकांत रामटेके, पो.स्टे. चंद्रपूर शहर यांच्या नेतृत्वात झाली.
*कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी:*
सपोनि. राजेंद्र सोनवणे, पोउपनि. दत्तात्रय कोलते, पोउपनि. विलास निकोडे आणि त्यांच्या डी.बी. पथकाने केली.
*कर्मचारी*: मपोहवा. भावना रामटेके, सचिन बोरकर, संजय धोटे, कपुरचंद खरकवार, जावेद सिद्दीकी, निकेश ढेंगे, रूपेश रणदिवे, संतोष दंडेवार , पो.अं. रूपेश पराते, विक्रम मेश्राम, योगेश पिदुरकर, निलेश ढोक, सुशांत घिवे, प्रफुल भैसारे यांनी केलेली आहे.