*राजुरा ठाणे येथील गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कार्यवाही*
*ज्योत्स्ना वानखेडे*
पोलीस स्टेशन राजुरा येथे दिनांक: 08/07/2026 रोजी, फिर्यादी नामे श्री. निवास मदनय्या चिंताला वय 58 वर्षे, व्यवसाय नोकरी – सेक्युरिटी गार्ड, जात – मादगी, रा. धोपटाळा कॉलनी, ता. राजुरा, जि. चंद्रपूर यांनी पोस्टेला तक्रार दिली की, दिनांक: 06/07/2026 रोजी पवनी 02 कोल माईन्स येथे ड्युटीवर असताना दुपारी 03:00 वा. दरम्यान माईन्स मध्ये टी पॉईंट एरिया राऊंड मारण्याकरिता गेलो असता माईन्स मध्ये टी पॉईंट मध्ये ठेवून असलेला अॅल्युमिनियम तार ठेवून असलेल्या जागेवर मला दिसून आले नाही. अॅल्युमिनियम तारचा आजुबाजूला शोध असता मिळून आले नाही.
सदर अॅल्युमिनियम तार 04 एम.एस. जाडीचा 2000 फूट अॅल्युमिनियम तार, किं. 1,00,000/- रु. चा माल कोणतरी अज्ञात चोरट्याने अॅल्युमिनियम तार चोरून नेले आहे. अशा फिर्यादीच्या तोंडी तक्रारीवरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, मा. पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली डि.बी. इंचार्ज सपोनी लक्ष्मण लोकरे व सोबत डी.बी. स्टाफ यांनी गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध करीत असताना गोपनीय बातमीदार कडून मिळालेल्या माहितीवरून खालील नमूद आरोपी यास ताब्यात घेऊन अटक केली व त्यांच्याकडून गुन्ह्यात दाखल असलेल्या अॅल्युमिनियम तार खालीलप्रमाणे जप्त केले आहे.
*पोलीस स्टेशन अप. क्र. 602/2026 कलम 303(2) भा.न्या.सं.*
*आरोपीचे नाव:*
1. *सुरज शालिक क्षिरसागर* वय 32 वर्षे, धंदा – ड्रायव्हर, जात – धोबी, रा. बाबापूर, ह.मु. साखरी, ता. राजुरा
2. *प्रितम सुरेश बेसुरवार* वय 30 वर्षे, धंदा – ड्रायव्हर, जात – धोबी, रा. साखरी, ता. राजुरा
3. *निखील विठोबा मुक्के* वय 29 वर्षे, धंदा – ड्रायव्हर, जात – धोबी, रा. चार्ली, ता. राजुरा
*जप्त अॅल्युमिनियम तार वर्णन:*
चार नग अॅल्युमिनियम बंडल कि अं. 1,00,000/- रु. व चोरीचा माल नेण्याकरिता वापरलेले एक जुने वापरती टाटा कंपनीचा आयचर वाहन क्र. MH-35-AJ-4313 किं. अंदाजे 30,00,000/- रु.
*असा एकूण किंमत 31,00,000/- रु. चा माल जप्त.*
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी, सा. चंद्रपूर, मा. अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, सा. चंद्रपूर, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सुधीर नंदनवार, सा. राजुरा यांच्या मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाचे सपोनी लक्ष्मण लोकरे, सफौ. किशोर तुमराम, पोहवा विक्की निर्वाण, पोहवा अनुप डांगे, पो.अ. शफीक शेख, महेश बोलगोडवार, मिलिंद जांभुळे, रमेश बस्सी यांनी केली आहे.