Friday, July 10, 2026
HomeCrime*स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांची कारवाई* *घरफोडी करणारा सराईत आंतरराज्यीय...
spot_img

*स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांची कारवाई* *घरफोडी करणारा सराईत आंतरराज्यीय गुन्हेगारास जेरबंद करून चंद्रपूर जिल्ह्यातील 6 घरफोडी व 3 मोटार सायकलचे गुन्हे उघड करण्यात आले.*

*स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांची कारवाई*

*घरफोडी करणारा सराईत आंतरराज्यीय गुन्हेगारास जेरबंद करून चंद्रपूर जिल्ह्यातील 6 घरफोडी व 3 मोटार सायकलचे गुन्हे उघड करण्यात आले.*

*ज्योत्स्ना वानखेडे*
**पोलीस ठाणे**
बल्लारपूर जि. चंद्रपूर
**अपराध क्रमांक आणि कलम*
*गुन्हा रजि.क्र. 606/2026
**फिर्यादीचे नाव व पत्ता**
श्रीमती. रजिता परमेश्वर सिंघाराव वय 39 वर्षे रा. गोरक्षण वार्ड बल्लारपूर जि. चंद्रपूर
**गुन्हा घटना ता. वेळ*
दिनांक 19/05/2026 चे 13:30 ते 16:00 वा. दर. **गुन्हा दाखल ता. वेळ*
दि. 19/05/2026 चे 23:00 वा.
**माहिती कशी प्राप्त झाली**
सी.सी.टी.व्ही. फुटेज व तांत्रीक तपासातुन
*कारवाई करणारे अधिकारी व अंमलदार*
मा. श्री. आयुष नोपानी सा., पोलीस अधीक्षक, चंद्रपूर.
मा. श्री. ईश्वर कातकडे सा., अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर.
*यांच्या मार्गदर्शनाखाली*
पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, प्रभारी स्था. गु. शा. चंद्रपूर.
पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे, ठाणेदार पो. स्टे. बल्लारपूर
सहा. पोलीस निरीक्षक दिपक काँक्रेडवार, स्था. गु. शा. चंद्रपूर.
सहा. पोलीस निरीक्षक बलराम झाडोकार, स्था. गु. शा. (सायबर सेल) चंद्रपूर.
पोलीस उपनिरीक्षक विक्की लोखंडे, पोलीस ठाणे बल्लारपूर.
सफौ/स्वामीदास चालेकर, पो.हवा./किशोर वैरागडे, पोहवा./अजय बागेसर, पोहवा/शरद कुडे,
पोअं./गोपीनाथ नरोटे, पोअं/शेखर माथनकर, चापोअं/वृषभ बारसिंगे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर तसेच
पोहवा/विकास जुमनाके, पोअं./वैभव गाडगे पोलीस ठाणे बल्लारपूर जि. चंद्रपूर.
*आरोपीची पूर्व इतिहास*
आरोपी नामे *चिन्नाबाबु व्यंकटेश्वरलु गोरेला*, रा. राजमुंद्ररी (राजमहेंद्रवरम) राज्य आंध्रप्रदेश. यांच्यावर यापूर्वी राज्य आंध्रप्रदेश येथील वेगवेगळ्या पोलीस ठाणे येथे एकूण *41 घरफोडी/चोरीचे गुन्हे* नोंद आहेत. तसेच राज्य तेलंगाणा येथील वेगवेगळ्या पोलीस ठाणे येथे एकूण *6 घरफोडी/चोरीचे गुन्हे* नोंद आहेत.
*आरोपीची मोडस ऑपरेंडी (MODUS OPERANDI)*
आरोपी हा रेल्वेने प्रवास करून सोबत कॅप, तोंडाला मास्क आणि कॉलेज बॅग बाळगून रेल्वे स्टेशन परिसरातून मोटार सायकल चोरी करतो. त्यानंतर ती चोरी केलेली मोटार सायकल वापरून आजूबाजूच्या परिसरातील बंद घर पाहून तिथे चोरी करतो. त्यानंतर चोरी केलेली मोटार सायकल ही रेल्वे स्टेशन परिसरात सोडून देऊन परत रेल्वेने आपले मुळ गावी परत जातो. आरोपी हा रेल्वेने प्रवास करताना कोणतेही तिकीट बाळगत नाही.
*आरोपी नाव व पत्ता व अटक तारीख वेळ*
*चिन्नाबाबु व्यंकटेश्वरलु गोरेला*, वय 32 वर्षे, व्यवसाय शिक्षण
रा. 21-7-19/बी, 3 री गल्ली कोरलामा पेट्टा, देवी चौक, राजमहेंद्रवरम (शहर) ईस्ट गोदावरी राज्य आंध्रप्रदेश.
मो. क्र. 7998956760, 9666295247
*दिनांक 08/07/2026 रोजी अटक करण्यात आली*
*उघडकीस आले गुन्हे*
1.  पोलीस ठाणे बल्लारपूर गुन्हा नोंद क्र. 606/2026 कलम 331(3), 305 भा.न्या.सं.
2.  पोलीस ठाणे बल्लारपूर गुन्हा नोंद क्र. 608/2026 कलम 303(2) भा.न्या.सं.
3.  पोलीस ठाणे बल्लारपूर गुन्हा नोंद क्र. 751/2026 कलम 303(2) भा.न्या.सं.
4.  पोलीस ठाणे राजुरा गुन्हा नोंद क्र. 427/2026 कलम 331(3), 331(4), 305 भा.न्या.सं.
5.  पोलीस ठाणे राजुरा गुन्हा नोंद क्र. 450/2026 कलम 331(3), 331(4), 305 भा.न्या.सं.
6.  पोलीस ठाणे राजुरा गुन्हा नोंद क्र. 489/2026 कलम 303(2), 62 भा.न्या.सं.
7.  पोलीस ठाणे राजुरा गुन्हा नोंद क्र. 576/2026 कलम 303(2) भा.न्या.सं.
8.  पोलीस ठाणे चंद्रपूर शहर गुन्हा नोंद क्र. 339/2025 कलम 331(3), 331(4), 305 भा.न्या.सं.
9.  पोलीस ठाणे रामनगर गुन्हा नोंद क्र. 1028/2025 कलम 331(3), 331(4), 305 भा.न्या.सं.
*जप्त मुद्देमाल :*
1.  एक हिरो होंडा पॅशन प्रो. मो. सा. क्र. MH.34 B.M. 5130 किं. 40,000/- रु.
2.  हिरो होंडा स्प्लेंडर मो. सा. क्र. MH 34 B.E. 9959 किं. 30,000/- रु.
3.  एक डेस्टिनी कंपनीची मोपेड क्र. MH 34 C.C. 3275 किं. 50,000/- रु.
4.  सोन्याचे दागिने किं. अंदाजे 3,20,000/- रु. _(आरोपीने राजमुंद्ररी येथे गोल्ड कंपनीमध्ये विक्री केले असून हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे.)_
5.  चांदीचे दागिने किं. अंदाजे 25,000/- रु.
    *असा एकूण 4,65,000/- रु. चा मुद्देमाल*
*गुन्ह्याची थोडक्यात हकीकत :-*
घटना ता. वेळी व ठिकाणी यातील नमुद फिर्यादीने पोलीस ठाणे बल्लारपूर येथे येवुन तोंडी तक्रार दिली की, दिनांक: 19/05/2026 रोजी फिर्यादी ही तिचे घराला लॉक करून आपले कामावर निघुन गेली. त्यानंतर ती कामावरुन घरी येवुन पाहिले असता तिचे घराचे लॉक तुटुन असुन घरातील लोखंडी आलमारीतील सोन्या-चांदीचे दागिने किं.अं. 2,87,000/- रु. व रोख रक्कम 5,000/- रु. असा एकुण 2,92,000/- रु. चा मुद्देमाल कुणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेला. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखुन मा. पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, मा. अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस घरफोडी करणारे इसमांची माहिती काढुन त्यांच्यावर कारवाई करून, मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे निर्देश दिले होते.
सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक दिपक कां काँक्रेडवार, सपोनि बलराम झाडोकार व स्टॉफ यांचे एक पथक तयार करून घरफोडी उघड आणण्याबाबत सुचित करण्यात आले होते.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने आजुबाजुचे परिसरातील सि.सि.टि.व्ही. फुटेज, तांत्रीक माहिती व गोपनीय माहितीच्या आधारे माहिती प्राप्त करून सदर गुन्ह्यातील आरोपींस निष्पन्न करून आरोपीचा शोध कामी राजमुंद्ररी (राजमहेंद्रवरम) राज्य आंध्रप्रदेश येथुन ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी तेलंगाणा येथील पोलीस अंमलदार नरेश दत्त यांनी आरोपीची ओळख पटविण्यास मोलाची मदत केली.
सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन यापुर्वी त्याच्यावर आंध्रप्रदेश व तेलंगाणा राज्यात एकुण 47 घरफोडी/चोरीचे गुन्हे नोंद आहेत.
सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी पोलीस ठाणे बल्लारपूर यांचेकडे वर्ग करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस ठाणे बल्लारपूर करीत आहेत. सदर आरोपीकडून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page