Saturday, July 11, 2026
HomeEducationजि. प. शाळा आरवट येथे शालेय साहित्याचे वाटप.
spot_img

जि. प. शाळा आरवट येथे शालेय साहित्याचे वाटप.

जि. प. शाळा आरवट येथे शालेय साहित्याचे वाटप.

*ज्योत्स्ना वानखेडे*
श्री माता महाकाली देवस्थान चंद्रपूर चे विश्वस्त सुनीलजी महाकाले यांच्या सौजन्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आरवट येथील विद्यार्थ्यांना नोटबुक व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी आरवट येथील सरपंच माननीय सौ. सुलभा भोंगळे प्रामुख्याने उपस्थित होत्या.
जिल्हा परिषद शाळा आरवट येथील शाळेत कष्टकरी कामगारांचे पाल्य शिक्षण घेत असून त्यांना शालेय साहित्य विकत घेण्यास अडचण निर्माण होत होती. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे पदाधिकारी श्री विवेक आंबेकर यांनी ही बाब लक्षात घेऊन माननीय सुनीलजी महाकाले यांच्याशी संपर्क साधून त्यांच्यातर्फे देणगी स्वरूपात शालेय साहित्याचे वाटप करण्याचा कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री दुर्गे सर यांच्या सहकार्याने घडवून आणला. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य प्राप्त झाल्यामुळे त्यांनी व पालकांनी देणगीदारांचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन विवेक आंबेकर यांनी  तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक श्री दुर्गे सर यांनी केले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page