Saturday, July 11, 2026
HomeCrime*गावठी पिस्तूल व ५ जिवंत काडतुसांसह सराईत गुन्हेगार धीरज दयाल उर्फ दिलशान...
spot_img

*गावठी पिस्तूल व ५ जिवंत काडतुसांसह सराईत गुन्हेगार धीरज दयाल उर्फ दिलशान काजी याला स्थानिक गुन्हे शाखेने केले अटक*

*गावठी पिस्तूल व ५ जिवंत काडतुसांसह सराईत गुन्हेगार धीरज दयाल उर्फ दिलशान काजी याला स्थानिक गुन्हे शाखेने केले अटक*

*ज्योत्स्ना वानखेडे*

चंद्रपूर जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आणि दहशत पसरवणाऱ्या गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्याच्या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने (L.C.B.) एक मोठी यशस्वी कारवाई केली आहे. रेल्वे स्टेशन जवळील मुन्ना कॅन्टीन परिसरातून एका सराईत गुन्हेगाराला लोखंडी अग्निशस्त्र (पिस्तूल), ५ जिवंत काडतुसे आणि मोबाईलसह रंगेहात अटक करण्यात आली आहे.

*घटनेचा तपशील व कारवाई:*

दिनांक: 10/07/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी रामनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना विश्वसनीय मुखबिराद्वारे खात्रीशीर बातमी मिळाली की, रेल्वे स्टेशनजवळील मुन्ना कॅन्टीनच्या बाजूला, जलनगर वार्ड येथे एक इसम सार्वजनिक ठिकाणी उभा राहून आपल्या जवळ शस्त्र बाळगून लोकांमध्ये दहशत पसरवीत आहे.

सदर बातमीच्या आधारे पोलिसांनी पंचांसमक्ष तात्काळ घटनास्थळी धाड टाकून संशयित इसमाला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला खोचले १ लोखंडी पिस्तूल आणि पॅन्टच्या पाठीमागील खिशात जिवंत काडतुसे मिळून आली.

*अटक आरोपीची माहिती:*

*नाव:* दिलशान काजी सादीक काजी उर्फ धीरज मोहन दयाल, वय 30 वर्षे, रा. सपना टॉकीज जवळ, जलनगर वार्ड, चंद्रपूर.

*जप्त करण्यात आलेला एकूण मुद्देमाल:*

1.  *लोखंडी अग्निशस्त्र (पिस्तूल):* एक जुनी वापरती बनावटी लोखंडी पिस्तूल – किंमत 25,000/- रुपये

2.  *जिवंत काडतुसे:* 05 नग जिवंत काडतुसे – किंमत 2,500/- रुपये

3.  *मोबाईल फोन:* एक जुना वापरता काळ्या रंगाचा विवो व्हि-2022 कंपनीचा मोबाईल – किंमत 10,000/- रुपये

    *एकूण हस्तगत मुद्देमाल: 37,500/- रुपये*

*गुन्हा नोंद व पुढील तपास:*

सदर प्रकरणी आरोपी धीरज दयाल उर्फ दिलशान काजी याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन रामनगर येथे अपराध क्र. 908/2026, कलम 3, 25 भारतीय हत्यार कायद्यान्वये (Arms Act) गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपासाकरिता आरोपीला रामनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

*कारवाई पथक (Action Team):*

सदर यशस्वी कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री *आयुष नोपानी*, मा. अपर पोलिस अधीक्षक श्री *ईश्वर कातकडे* यांच्या मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर श्री *अमोल काचोरे* यांच्या नेतृत्वात सपोनि. *योगेश हिवसे*, पोउपनि *विनोद भुरले*, पोउपनि *सुनील गौरकार*, पोहवा *सुभाष गोहोकार*, *सतीश अवथरे*, *रजनिकांत पुठ्ठावार*, *दीपक डोंगरे*, *इम्रान खान*, *शरद कुडे*, पोअं *हिरालाल गुप्ता*, *किशोर वाकाटे* आणि *शशांक बदामवार* यांनी केली आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page