Sunday, July 12, 2026
HomeRajura*राजुरा ठाणे येथील गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कार्यवाही*
spot_img

*राजुरा ठाणे येथील गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कार्यवाही*

*राजुरा ठाणे येथील गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कार्यवाही*

*ज्योत्स्ना वानखेडे*

पोस्टे राजुरा येथे दिनांक: 10/07/2026 रोजी पो.स्टे टाऊन परिसरात पेट्रोलिंग करीत असताना खास गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर खबर मिळाली की, मौजा इंदिरानगर वार्ड राजुरा येथील रोडचे बाजुला एक सिल्वर रंगाचे मारोती सुझूकी कंपनीची इको गाडी क्र. *MH 34 AA 4996* यामध्ये शासनाने बंदी घातलेली सुगंधीत तंबाखु ठेवुन आहे.

अशा माहितीवरून शहानिशा करणे कामी आम्ही वरील नमुद पोलीस स्टॉप सह इंदिरानगर वार्डातील गेलो असता त्या ठिकाणी मुखबिरने सांगितल्याप्रमाणे एक सिल्वर रंगाची मारोती सुझूकी कंपनीची इको कार क्र. *MH 34 AA 4996* ही गाडी उभी दिसली व त्या गाडीमध्ये एकही इसम दिसुन आला नाही. तेव्हा आम्ही सदर गाडीचे चालक व मालकाबत आजुबाजुचे लोकांना विचारपुस तसेच चौकशी केली असता कोणतेही प्रकारची उपयुक्त माहिती मिळुन आली नाही.

तेव्हा आम्ही सदर मारोती सुझूकी कंपनीची इको गाडी क्र. *MH 34 AA 4996* या वाहनाची प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु संबंधाने पोलीस स्टॉपचे मदतीने झडती घेतली असता गाडीचे मधल्या व मागील सिटवर एकुण 10 प्लॉस्टीक चुंगड्यामध्ये शासनाने बंदी घातलेली सुगंधीत तंबाखु व पान मसाला दिसुन आल्याने दोन पंचासमक्ष सुगंधीत तंबाखु व पान मसाला (गुटखा) नी भरलेली मारोती सुझूकी कंपनीची इको गाडी क्र. *MH 34 AA 4996* या वाहनाची पाहणी केली असता त्या मध्ये खालील वर्णनाचा माल मिळुन आला.

*जप्त मुद्देमालाचा तपशील:*

1.  *कि. 21,600/- रु.* – एका प्लॉस्टीक चुंगडीमध्ये ANNI Gold Sweet Supari असे लिहीले, प्रत्येकी 100 ग्रॅमचे सिलबंद 360 नग पाउच, प्रत्येकी किं.अं 60/- रु प्रमाणे

2.  *कि. 6,600/- रु* – एका प्लॉस्टीक चुंगडीमध्ये Signiture finest Pan Masala असे लिहीलेले प्रत्येकी 137.5 ग्रॅमचे सिलबंद 15 पाऊच, प्रत्येकी पाऊच, प्रती पाऊच किं. 440/- रु. नगप्रमाणे

3.  *कि. 9120/- रु.* – एका प्लॉस्टीक चुंगडीमध्ये राजु निवास सुगंधीत पान मसाला असे लिहीलेले एकुण सिलबंद 76 पॉकिटे, प्रती पॉकिट 120/- रु प्रमाणे

4.  *कि. 44,550/- रु.* – एका प्लॉस्टीक चुंगडीमध्ये राजश्री पान मसाला असे लिहीलेले, प्रत्येकी 172.5 ग्रॅमचे सिलबंद 165 पॉकिटे, प्रती पॉकिट 270/- रु. प्रमाणे

5.  *कि. 5,400/- रु.* – एका चुंगडीमध्ये Black LABEL 18-KP तंबाखु असे लिहीलेले, एकुण 180 सिलबंद पॉकिटे, प्रती पॉकिट 30/- रु प्रमाणे

6.  *कि. 2,280/- रु* – एका चुंगडीमध्ये ZN-01 ZAFRANI ZARDA तंबाखु असे लिहीलेले, एकुण 76 सिलबंद पॉकिटे, प्रती पॉकिट 30/- रु प्रमाणे

7.  *कि. 1500/- रु.* – एका चुंगडीमध्ये BAJZRAO FLAVEOURED PAN MASALA GOLD असे लिहीलेले, एकुण 10 पॉकिटे, प्रती पॉकिट 150/- रु. प्रमाणे.

8.  *कि. 3861/- रु.* – एका प्लॉस्टीक थैलीमध्ये ACTZON Premium Chewing tobacco असे लिहीलेले, एकुण 39 पॉकिटे, प्रत्येकी 14.85 ग्रॅमचे, प्रती पॉकिट 99/- रु. प्रमाणे

9.  *कि. 24156/- रु.* – एका प्लॉस्टीक चुंगडीमध्ये विमल पान मसाला (सुपारी) असे लिहीलेले, प्रत्येकी 126.5 ग्रॅमचे एकुण सिलबंद 122 गुलाबी पॉकिटे, प्रती पॉकिट 198/- रु प्रमाणे

10. *कि. 2794/- रु.* – एका चुंगडीमध्ये वि-1 तंबाखु किंग पॅक असे लिहीलेले सिलबंद 127 गुलाबी पॉकिटे, प्रती पॉकिट 22/- रु प्रमाणे

11  *कि. 18360/- रु.*  एका प्लॅस्टीक चुंगडीमध्ये “विमल पान मसाला (सुपारी)” असे लिहीलेले, एकूण सिलबंद 153 काळे पॉकीटे, प्रती पॉकिट 120/-रु प्रमाणे

12  *कि.11250/- रु*  एका चुंगडीमध्ये “वि-1 तंबाखु” असे लिहीले सिलबंद 375 काळे पॉकीटे, प्रती 30/-रु प्रमाणे

13  *कि.420/- रु.*  एका प्लॅस्टीक थैलीमध्ये “MASTANI तंबाखु” असे लिहीले सिलबंद 14 पॉकिटे, प्रती पाऊच 30/- रु प्रमाणे

14  *कि.5,00,000/- रु*  सुगंधीत तंबाखु व पान मसाला सुपारी मुद्देमाल करीता वापरलेली एक जुनी वापरती सिल्वर रंगाची मारुती सुझुकी कंपनीची इक्को चारचाकी वाहन क्र. MH 34 AA 4996

वरील येणेप्रमाणे सुगंधीत तंबाखु व पान मसाला(गुटखा) एकूण कि. 1,51,891/- रु व मारुती सुझुकी कंपनीची इक्को चारचाकी वाहन क्र. MH 34 AA 4996 कि.अं कि.5,00,000/- रु असा एकूण कि. 6,51,891 चा मुद्देमाल माल मिळुन आला.

यातील वाहन क्र. MH 34 AA 4996 चा फरार चालक/मालक यांनी मा. अन्न सुरक्षा आयुक्त अन्न व प्रशासन (म.रा.) यांची अधिसुचना क्र.1.असुमाअ/अधिसुचना//411/2025/7 दि.16 जुलै 2025 व 2) क्र.पोमसं/22/ प्रतिबंधित अन्नपदार्थ बंदी/कारवाई/ 633/ 2018- 2022 मुंबई दि.29/06/2021 अन्वये शासनाने सुगंधीत तंबाखूजन्य पदार्थावर बंदी घातली असतांना सुध्दा शासनाचे आदेशाची अवहेलना करून जनतेच्या आरोग्यास अपायकारक व असुरक्षित अशा सुगंधीत तंबाखूजन्य पदार्थ अवैधरित्या विक्री करण्याचे उद्देशाने वाहनमध्ये बाळगुण असता मिळुन आल्याने त्याचे विरुध्द कलम 123,274,275,223 भा.न्या.सं सहकलम 26(2),(a), 26 (2)(i), 26(2) (iv),30 (2)(a),59 अन्न व सुरक्षा मानके अधिनियम 2006 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

*सदरची कार्यवाही* मा.पोलीस अधीक्षक श्री.आयुष नोपानी सा चंद्रपूर, मा.अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे सा. चंद्रपूर, मा.उप विभागिय पोलीस अधिकारी श्री.सुधीर नंदनवार सा राजुरा यांचे मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक नितिन चिंचोळकर, यांचे नेतृत्वाखाली .श्री प्रणय दामोधर कांबळे व पथक अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन चंद्रपूर व गुन्हे शोध पथकाचे सपोनी लक्ष्मण लोकरे, सफौ किशोर तुमराम, पोहवा विक्की निर्वाण, पोहवा अनुप डांगे, पो.अ. शफीक शेख, मिलिंद जांभुळे, महेश बोलगोडवार शरद राठोड रमेश बस्सी, यांनी केली आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page