*पापा जाधव हत्याकांडातील ६ वा आरोपी गजाआड; मोक्का अंतर्गत कारवाई*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
राजुरा येथील बहुचर्चित पापा जाधव हत्या प्रकरणातील सहाव्या आरोपीला अटक करण्यात राजुरा पोलिसांना यश आले आहे. अंकित बापुजी मासीकरकर वय २४ वर्षे, रा. चुनाळा, ता. राजुरा, जि. चंद्रपूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
दिनांक २४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी १७:३० ते १८:०० वाजेच्या सुमारास राजुरा येथील प्रदीप बारजवळ पापा जाधव यांची अग्निशस्त्राने गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलीस स्टेशन राजुरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरुवातीला पोलीस निरीक्षक, पो.स्टे. राजुरा यांनी तपास करून गुन्ह्यातील ५ आरोपींना अटक केली होती. तपासादरम्यान या गुन्ह्यात संघटित गुन्हेगारी टोळीचा सहभाग निष्पन्न झाल्याने गुन्ह्यामध्ये ‘मकोका’ (MCOCA १९९९) कायद्यांतर्गत कलमांची वाढ करण्यात आली.
गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा श्री कुमार सुशांत (भापोसे) यांनी हाती घेतला. गोपनीय माहिती व तपासाच्या आधारे अंकित बापुजी मासीरकर याचा सदर गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. न्यायालयाकडून आरोपीची ५ दिवसांची पोलीस कोठडी (PCR) प्राप्त करण्यात आली असून सखोल तपास सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा श्री कुमार सुशांत, श्री. नितीन चिंचोळकर पोलीस निरीक्षक / ठाणेदार, पो.स्टे. राजुरा, पोउपनि. सुरेंद्र उपरे (मकोका तपास पथक), अंमलदार सुरेंद्र काळे, दिनेश वैद्य, रवी तुराणकार, महेश बोलगोडवार, भूषण इटनकर