Thursday, July 16, 2026
HomeCrime*गांजा साठा बाळगुन विक्री करणाऱ्या इसमाविरुद्ध चंद्रपूर शहर पोलिसांनी केली कार्यवाही*
spot_img

*गांजा साठा बाळगुन विक्री करणाऱ्या इसमाविरुद्ध चंद्रपूर शहर पोलिसांनी केली कार्यवाही*

*गांजा साठा बाळगुन विक्री करणाऱ्या इसमाविरुद्ध चंद्रपूर शहर पोलिसांनी केली कार्यवाही*

*ज्योत्स्ना वानखेडे*
 दि. *15/07/2026* रोजी मा. पोलीस निरीक्षक सा. यांचे आदेशाने सपोनि. *राजेंद्र सोनवने* सोबत डि.बी.स्टाफसह प्रो.व्ही, जुगार रेड, कज्मशन केसेस करणेकामी पो.स्टे. परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना मुखबीरद्वारे खबर मिळाली की, एक इसम नाव *पांडुरंग बानलवार* रा. भिवापुर वार्ड चंद्रपूर हा त्याचे राहते घरात गांजा बाळगुन विक्री करीत आहे.
अशी माहिती मिळाल्याने सदर माहितीची खात्री करून पंचासमक्ष रवाना होवुन भिवापुर वार्ड येथील पांडुरंग बानलवार यांचे राहते घराची खात्री करून पंचासमक्ष घरझडती घेतली असता, त्याचे घराचे पहिल्या रुममध्ये बेडखाली एका प्लॅस्टीक पिशवीत वाळलेली हिरव्या रंगाची पाने, फुले, देठ, बिया अशी गांजा सदृश्य वनस्पती *1 किलो 109 ग्रॅम* वजनाचे एकूण किंमत *₹15,000/- रु.* चा माल मिळून आल्याने *कलम 8(क), 20(ब) (2) NDPS ACT* अन्वये सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
*सदर कार्यवाही* मा. पोलीस अधीक्षक *श्री. आयुष नोपानी* सा. चंद्रपूर, अपर पोलीस अधीक्षक *ईश्वर कातकडे*, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी *श्री. प्रमोद चौगुले* यांचे मार्गदर्शनात पो.नि. *निशीकांत रामटेके* पो.स्टे. चंद्रपूर शहर, यांचे नेतृत्वात सपोनि. *राजेंद्र सोनवणे*, पोउपनि. *दत्तात्रय कोलते*, पोउपनि. *विलास निकोडे* व डि.बी. पथक. मपोहवा. *भावना रामटेके*, पो.हवा. *संजय धोटे*, *जावेद सिद्दीकी*, *रूपेश रणदिवे*, *संतोष दडेवाड*, *संतोष कनकम*, नापोअं *कपुरचंद खरवार*, पो.अं. *रूपेश पराते*, *विक्रम मेश्राम*, *योगेश पिदूरकर*, *निलेश ढोक*, *सुशांत घिवे*, *प्रफुल भैसारे*, *दीपीका झिंगरे* यांनी केलेली आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page