*ज्योत्स्ना वानखेडे*
फिर्यादी *संदीप जयदेव भानसे*, वय 46 वर्षे, काम-लेखापरिक्षक श्रेणी-2, सहकारी संस्था चंद्रपूर यांनी *श्री. साई नागरी सहकारी पत संस्था मर्या. चंद्रपुर रजि.क्र.376* या पतसंस्थेचे रोख पुस्तक जमा व खर्चाचे व्हाऊचर्स, बँक व गुंतवणुक स्टेटमेंट व कर्ज प्रकरणे. तसेच संस्थेचे सन *2023 ते 2025* या कालावधीचे आर्थिक पत्रकाची तपासणी केली असता, यातील नमुद संस्थेचे *30 संचालक, 03 व्यवस्थापक व 1 पिग्मी एजंट* यांनी संगणमत व कट करून खालील प्रकारे आर्थिक अपहार केला आहे:
1. गुंतवणुकदारांकडून स्विकारलेल्या ठेवीमध्ये दोनदा मुदत ठेव परत करणे.
2. दोन मुदत ठेवीमधील एका मुदत ठेवीची नोंद घेणे.
3. अखेर शिल्लक, कर्ज, व्याज, इतर रक्कमेच्या नोंदी कॅश बुकमध्ये न घेणे.
4. कॅश बुकमध्ये खोट्या व बनावट नोंदी दर्शविणे.
5. खर्च, जमा बाजुच्या व्हाऊचरच्या नोंदी बनावटीकरण करणे.
6. अभिकर्त्यांनी स्विकारलेल्या ठेवीमधील काही रक्कम कमी जमा करणे.
7. कॅश बुक व बँक खात्यामध्ये तफावत करणे.
8. उपविधीमधील कर्ज रेशिओचे उल्लंघन करून बनावट कर्ज वाटप करून गुंतवणुकदारांच्या ठेवीची मुदत संपल्यानंतर व्याज, लाभांश, फायदा, ठेव परत न करता ठेविदारांच्या स्विकारलेल्या *₹2,49,08,949/- रुपयाच्या* ठेवी परत न करता आर्थिक अपहार केलेला आहे.
अशा लेखी रिपोर्टवरून आरोपीत संचालक, व्यवस्थापक व एजंट विरुद्ध *पो.स्टे. रामनगर अप.क्र. 882/2026 कलम 316(5), 318(4), 61(2), 336(2), 336(3), 338, 340 भा.न्या.सं. 2023* अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांचेकडे तपास सुरु आहे.
*गुंतवणुकदार यांना ठेवी परत मिळण्याकरीता फार्म भरून देण्याचे आव्हान*
*श्री. साई नागरी सहकारी पत संस्था मर्या. चंद्रपुर रजि.क्र.376* या पतसंस्थेत गुंतवणुकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणुक केली असून गुंतवणुकदारांची ठेवी परत मिळण्याकरीता *महाराष्ट्र ठेविदारांच्या (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण) अधिनियम सन 1999* व महाराष्ट्र शासन परिपत्रक क्रमांक *एम पी आय /प्र.क्र. 09/पोल-11 दिनांक 25/02/2019* अन्वये कार्यवाही करणे असल्याने नमुद पतसंस्थेत गुंतवणुकदारांनी केलेल्या गुंतवणुकीसंबधातील वैध दस्तऐवजासह आर्थिक गुन्हे शाखा, दुर्गापुर पोलीस स्टेशन आवार चंद्रपुर येथे येवून ठेवी परत मिळण्याचा फार्म भरून द्यावा.असे *(योगिता चाफले)*
पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी कळविले आहे.