*चंद्रपूर शहरातील 5 सराईत गुन्हेगार चंद्रपूर जिल्ह्यातून तडीपार.*
*ज्योत्स्ना वानखेडे*
चंद्रपूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे.
चंद्रपूर शहर परिसरात नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या *5 सराईत गुन्हेगारांवर* महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे *कलम 56* अन्वये स्वतंत्रपणे *तडीपारीची कारवाई* करण्यात आली आहे.
*तडीपार केलेल्या आरोपींची नावे:*
1. *किसन उर्फ अमन महेंद्र डोगरे*, वय 27 वर्षे, रा. महावीर नगर भिवापुर वार्ड, चंद्रपूर
2. *विशाल पापा तांबे*, वय 30 वर्षे, रा. बाबुपेठ बाबानगर, चंद्रपूर
3. *गणेश राजु बैस*, वय 25 वर्षे, रा. बिनबा गेटजवळ बिनबा वार्ड, चंद्रपूर
4. *अनिल हिरामन ठाकुर*, वय 44 वर्षे, रा. नांदगाव पोडे, बल्लारशाह जि. चंद्रपूर
5. *नरसिंग गट्टु रेवेल्लीवार*, वय 51 वर्षे, रा. प्रकाश नगर, महाकाली कॉलरी, चंद्रपूर
*कारवाई का केली?*
या पाचही आरोपींवर *चोरी, घरफोडी, जबर दुखापत करणे, अवैध हत्यार बाळगणे, जुगार खेळणे, अवैधरित्या दारू विक्री करणे* असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
त्यांच्या वाढत्या गुन्हेगारीमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला होता. त्यांच्या दहशतीमुळे स्थानिक नागरिक आणि साक्षीदार न्यायालयात किंवा पोलिसांसमोर उघडपणे साक्ष द्यायला घाबरत होते.
या गुन्हेगारांना वेळीच आळा घालण्यासाठी चंद्रपूर शहर व रामनगर पोलीसांनी MPDA कलम 56 अन्वये तडीपारीचा प्रस्ताव तयार केला होता. *उपविभागीय दंडाधिकारी, चंद्रपूर* यांनी सर्व पुराव्यांची तपासणी करून या पाचही आरोपींना तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत.
*पोलिसांचे म्हणणे*
चंद्रपूर जिल्हा गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी अशी कडक कारवाई यापुढेही सुरू राहील. बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.
*ही कारवाई कोणी केली?*
मा. पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली
उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर श्री. प्रमोद चौगुले, चंद्रपूर शहर चे ठाणे प्रभारी श्री. निशीकांत रामटेके व रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणे प्रभारी सौ. प्रभावती एकुरके यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरित्या पूर्ण केली.