श्री साईबाबा गुरु पोर्णिमा उत्सव, आंब्याचे वृक्ष (रोपटे) व कपडे वाटप, पहिला वर्ग ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत शिकवणीचा वर्ग चे उदघाटन

*ज्योत्स्ना वानखेडे*:
दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा साईबाबा मंदिर शेंबाळ व साईबाबा मंदिर बालाजी वॉर्ड बल्लारपूर येथे भक्तिभावाने उत्सव साजरा करण्यात आला. साईबाबा मंदिर शेंबाळ येथे दि.28 व 29 ला 5 भजन मंडळाने भक्तिभावाने रात्री व दिवसात भजन कार्यक्रम घेण्यात आला. दि.29 ल सकाळी 11 वा.साईबाबा,चि आरती करून कार्यक्रमाची सुरुवात केली. 1 ते 10 वि. पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी वर्गाच्या शिक्षिका कु.प्रतीक्षा दिनेश जिवतोडे हिचा शांता जरीले यांच्या हस्ते शाल साडी श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. जेष्ठ नागरिक मोतीराम वाटेकर, सांबा काळे यांचा शाल श्रीफळ व कपडे देऊन सत्कार करण्यात आला.
त्यानंतर 350 साड्या ब्लँकेट, धोतर, व ईतर कपडे असे एकूण 1000 कपड्याचे वाटप करण्यात आले. त्यानंतर आंब्याच्या रोपटे 100 व ईतर फळ रोपटे असे 150 वृक्ष गावातील लोकांना वाटप करण्यात आले. श्री पांडुरंग जरीले यांनी आईवडील स्व.
उद्धवराव व स्व. सोना बाई जरीले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मोफत शिकविण्यासाठी शिकवणी वर्ग पहिल्या ते दहावीपर्यंत उदघाटन करण्यात आले. शिक्षिका ला श्री पांडुरंग जरीले दर महिन्याला मानधन देणार आहे. व्यक्तिमत्त्व विकास व सुसंस्कार चे मुलांना योग्य मार्गदर्शन करणार आहे. या कार्यक्रमाला श्री पांडुरंग जरीले, डॉ. हेमा खापने,विनायक राव साळवे, शांता जरीले, साई पिल्ले, ललित पिल्ले, प्रशांत मेश्राम, मनोज बेले नगर सेवक, गुलाबराव (मनोज)जिवतोडे, प्रतीक्षा जिवतोडे शिक्षिका, प्रफुल्ल जिवतोडे, प्रमोद जिवतोडे डेकोरेशन, शंकर पुलगमवार तुळशीराम महाकाळकर भास्कर शेडगे, प्रदीप मते,गजानन उबरे, यश मते,संजय जिवतोडे, अंशुमन आसुटकर, नंदा खोके, मंगेश पांचभाई,सविता खामणकर, सुवर्णा जिवतोडे, विनोद जिवतोडे, नयन जिवतोडे, राजु जिवतोडे, मंदा कुथे,शोभा खापणे,सुमन सातपुते, सीता मिलमिले, निर्मला कापले, सचिन बोडाले, अमरजीत मते,संध्या ताई कपाले,ज्योती मेश्राम, वर्षा दर्वे ईत्यादीनि अथक परिश्रम घेतले व उपस्थिती होती.