Tuesday, August 4, 2026
spot_img
HomeBirthdayडॉ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महाआरोग्य शिबिराला विक्रमी प्रतिसाद

डॉ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महाआरोग्य शिबिराला विक्रमी प्रतिसाद

डॉ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महाआरोग्य शिबिराला विक्रमी प्रतिसाद


१,४५६ नागरिकांची मोफत तपासणी; तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार, औषधोपचार व कर्करोग तपासणी

*Jyotsna Wankhede* : महाराष्ट्राचे लोकनेते, माजी मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा विक्रमी प्रतिसाद लाभला. स्थानिक राजीव गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मुल रोड, चंद्रपूर येथे दिवसभर पार पडलेल्या या शिबिरात १,४५६ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

शिबिरात सर्वसाधारण रोग निदान, नेत्ररोग तपासणी, कर्करोग तपासणी, क्षयरोग तपासणी, अस्थिरोग तपासणी,जनजागृती, विविध रक्त तपासण्या, मोफत औषध वितरण तसेच आवश्यक रुग्णांना पुढील उपचारासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सेवांचा लाभ घेतला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर, इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA), इंडियन डेंटल असोसिएशन (IDA), जिल्हा आरोग्य विभाग, शालिनीताई मेघे हॉस्पिटल आणि सुधीरभाऊ मित्र परिवार, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महाआरोग्य शिबिराचे मुख्य संयोजक डॉ. मंगेश गुलवाडे होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री.हरीश जी शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी चंद्रपूरच्या प्रथम नागरिक तथा महापौर सौ. संगीताताई खांडेकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रमोद जी कडू, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सचिव डॉ. ऋजुता मुंदडा, इंडियन डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. पंकज कावळे, डॉ. अश्विन रडके, डॉ. रवी आलूरवार, डॉ. मंगेश टिपणीस, डॉ. प्रविण पंत, ब्रिजभूषण पाझारे, नगरसेवक रवी लोणकर, प्रज्वलन कडू, जयश्री जुमडे, सविता सरकार, डॉ. ललित पटले, डॉ. कामरान, सागर खडसे आदी मान्यवर उपस्थित होते.

या शिबिरात इंडियन मेडिकल असोसिएशनचे  डॉ. सुधीर रेगुंडवार, डॉ. संदीप मुनगंटीवार, डॉ. अमित मामीडवार, डॉ. हर्ष मामीवार, डॉ. सचिन सरदेशपांडे, डॉ. कल्पना गुलवाडे, डॉ. नगीना नायडू, डॉ. अभय राठोड, डॉ. सौरभ राजूरकर, डॉ. सुमेर राणावत, डॉ. मनीष मुंदडा, डॉ. ज्योती चिद्दरवार, डॉ. अमित चिद्दरवार, डॉ. निखिल माडूरवार, डॉ. प्रसन्न मद्दीवार, डॉ. आसावरी देवतळे, डॉ. शर्मिली पोद्दार डॉ भार्गव बांडे  डॉ. अमर दुर्योधन डॉ. वसीम नागांनी डॉ. शाहरुख मलिक डॉ. रक्षा जयस्वाल डॉ. जयश्री नागपुरे डॉ. अथर्व सासनकर तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शालिनीताई मेघे हॉस्पिटल, नागपूर येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांना सेवा दिली.

महाआरोग्य शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रकाश धारणे, राजेंद्र गांधी,विशाल निंबाळकर, मनोज सिंघवी,रुद्रनारायण तिवारी,प्रलय सरकार,प्रशांत विघ्नेश्वर, धनराज कोवे, धम्मप्रकाश भस्मे, गणेश रामगुडेवार , नम्रता ठेमसकर, सुरज पेदुलवार,कुणाल गुंडावार,वाणी सदलावार, ज्योती वेलके, जयश्री आत्राम, सुप्रिया सरकार, डॉ. भारती दुधानी,  चंद्रकलाताई सोयाम, यश बांगळे , उमेश आष्टनकर, छबूताई वैरागडे, हिना खान सिंधुताई राजगुरे, हर्ष पोपट, सुजित मानकर,डॉ. शंकर टोकल, डॉ. प्रमोद रामटेके, सचिन यामावार, हिमांशु गादेवार, राहुल कांबळे, शैलेश सदालावार आणि रोहित चौबे यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुग्धा खांडे-गायकवाड यांनी केले, तर ब्रिजभूषण पाझारे यांनी आभार मानले.

सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा त्यांच्या दारी उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला. उपस्थित नागरिकांनी आयोजक संस्थांचे, सहभागी तज्ज्ञ डॉक्टरांचे आणि स्वयंसेवकांचे मनापासून कौतुक केले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page