आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा; धान चुकारांसाठी ५० कोटी ३१ लाखांचा निधी प्राप्त
शेतकऱ्यांच्या अडचणीची संवेदनशील दखल घेत सातत्याने पाठपुरावा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सकारात्मक निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मानले मुख्यमंत्र्याचे आभार
*Jyotsna Wankhede* : रब्बी हंगाम २०२५-२६ अंतर्गत हमीभावाने धान विक्री केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रलंबित चुकारांसाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या हक्काची रक्कम त्यांना वेळेत मिळावी, या संवेदनशील भावनेतून सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून, ५० कोटी ३१ लाख ८३ हजार रुपयांचा निधी चंद्रपूर जिल्हा मार्केटिंग कार्यालयाला शासनाकडून प्राप्त झाला आहे. त्यामुळे चुकारांच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, लवकरच ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशासाठी आ. मुनगंटीवार यांनी शासनस्तरावर केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा त्यांच्या शेतकऱ्यांप्रती असलेली संवेदनशीलता आणि बांधिलकी अधोरेखित करणारा आहे. या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी शासनाच्या हमीभाव खरेदी योजनेवर विश्वास ठेवून आपला धान शासकीय खरेदी केंद्रांवर विकला. मात्र धान विक्री होऊन बराच कालावधी उलटूनही अनेक शेतकऱ्यांचे चुकारे प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. वैद्यकीय खर्च, मुलांचे शिक्षण, घरगुती गरजा तसेच पुढील हंगामाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांना पैशांची आवश्यकता असताना चुकारे रखडणे ही गंभीर बाब असल्याचे लक्षात घेऊन आ. मुनगंटीवार यांनी या प्रश्नाची संवेदनशीलतेने दखल घेतली.
यासंदर्भात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी ३ जुलै २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र लिहून प्रलंबित चुकारांची रक्कम तातडीने अदा करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. शेतकऱ्यांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या मागणीची सकारात्मक दखल घेत संबंधित यंत्रणेला तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार आता ५० कोटी ३१ लाख ८३ हजार रुपयांचा निधी जिल्हा मार्केटिंग कार्यालयाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे प्रलंबित धान चुकारांच्या वितरणाचा मार्ग मोकळा झाला असून, आवश्यक प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा करण्यात येणार आहे.शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे केवळ प्रशासकीय बाब म्हणून न पाहता त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजांशी निगडित प्रश्न म्हणून आ. मुनगंटीवार सातत्याने पाठपुरावा केला. शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पैशासाठी शासनस्तरावर ठामपणे पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देण्याची त्यांची भूमिका यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाली आहे.
शेतकऱ्याने घाम गाळून पिकवलेल्या धानाची विक्री केल्यानंतर त्याच्या हक्काची रक्कम वेळेत मिळणे हा त्याचा अधिकार आहे. चुकारे रखडल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केला. मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने सकारात्मक दखल घेत निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहे.
शेतकऱ्यांच्या कष्टाची आणि त्यांच्या कुटुंबाच्या गरजांची जाणीव ठेवून त्यांच्या हक्कासाठी आवाज उठविणे हीच आपली जबाबदारी असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या हितासाठी आवश्यक तो पाठपुरावा यापुढेही सातत्याने सुरूच राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.