Tuesday, September 29, 2026
spot_img
HomeEducationजनता विद्यालय, बल्लारपूर येथे एलिमेंट्री व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा उत्साहात सुरू

जनता विद्यालय, बल्लारपूर येथे एलिमेंट्री व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा उत्साहात सुरू

जनता विद्यालय सिटी ब्रँच , बल्लारपूर येथे एलिमेंट्री व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा उत्साहात सुरू

*ज्योत्स्ना वानखेडे*:
    जनता विद्यालय सिटी ब्रँच बल्लारपूर (केंद्र क्रमांक: ११३००९) येथे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एलिमेंट्री आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा २०२६ चा आज दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी यशस्वी प्रारंभ झाला. या परीक्षेसाठी बल्लारपूर तालुक्यातील अंदाजे ९० विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने नोंदणी केली असून आज पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली.
      विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आर. ए. गंधारे यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली परीक्षा केंद्रावर  चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच विद्यालयाचे कला शिक्षक एस. एन. टोंगे यांनी सर्व विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था, परीक्षा क्रमांक आणि फलक लेखन अत्यंत शिस्तबद्ध व सुबक पद्धतीने सांभाळले आहे.
     पहिल्या दिवशी उपस्थित राहिलेल्या सर्व बालकलाकारांचे मुख्याध्यापिका आणि कला शिक्षकांनी कौतुक करून त्यांना पुढील पेपरसाठी शुभेच्छा दिल्या.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page