*भव्य बाल धम्म संस्कार शिबिराचे आयोजन*
*ज्योत्स्ना वानखेडे*
रविवार दिनांक 16 ऑगस्ट 2026 ला स. 11.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यन्त *बाल धम्म संस्कार शिबीर*संत तुकाराम महाराज सभागृह, बालाजी वार्ड बल्लारपुर येथे आयोजित केले आहे. हे शिबीर 6 ते 18 वर्ष वयोगटातील मूला- मुलींकरिता असणार आहे. बौद्ध धम्माची प्राथमिक ओळख, नैतिकता, व्यक्तिमत्व, शील, संस्कृति इत्यादि विषयावर जेष्ठ धम्मचारी पद्मरत्न यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. करिता पालकांना नम्र निवेदन आहे की त्यांनी आपल्या पाल्यांना सहभागी करुन घ्यावे.असे नम्र आवाहन धम्ममित्र भास्कर भगत, संपत कोरडे, संध्या गावंडे यांनी केले आहे.