Thursday, April 16, 2026
HomeParbhaniनूतन विद्यालयात जागतिक 'दिव्यांग दिन'साजरा.
spot_img

नूतन विद्यालयात जागतिक ‘दिव्यांग दिन’साजरा.

नूतन विद्यालयात जागतिक ‘दिव्यांग दिन’साजरा.

Jyotsna Wankhede : नूतन विद्यालयात जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला.या प्रसंगी नूतन विद्यालयातील सहशिक्षक कुशल कडे आणि शालेय पोषण आहार विभागात काम करणाऱ्या सौ संगीता पवार आणि चि.जाधव युवराज वर्ग 10वा (ग ) यांचा सन्मान करण्यात आला.या प्रसंगी कुशल कडे सरांनी दिव्यांगासाठी केंद्र शासन आणि राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या विविध सोयी सवलतीची आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या विविध शिष्यवृत्तीची माहिती देऊन शासनाचे विविध कायदे दिव्यांगासाठी संरक्षण देणाऱ्या असून समाजाने देखील दिव्यांगाचे दुःख समजून त्यांना मान,सन्मान द्यावे असे आवाहन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संतोष पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करून जागतिक इतिहासात दिव्यांगानी आपल्या विकलांगतेवर मात करून नेत्रदीपक यश मिळविले असे सांगितले.व्यासपीठावर उपमुख्याध्यापक किरण देशपांडे,पर्यवेक्षक रोहिदास मोगल,शंकर बोधनापोड उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ काशिनाथ पल्लेवाड यांनी केले तर प्रशांत नाईक यांनी आभार मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ शिल्पा बरडे , सुरेश हिवाळे,संगीत विभाग प्रमुख सच्चिदानंद डाखोरे यांनी पुढाकार घेतला.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page