Sunday, August 16, 2026
spot_img
HomeChandrapur*रेतीची (गौण खनिज) अवैध वाहतूक करून तस्करी करणाऱ्या ईसमांना केले पोलीस ठाणे...

*रेतीची (गौण खनिज) अवैध वाहतूक करून तस्करी करणाऱ्या ईसमांना केले पोलीस ठाणे रामनगर नी जेरबंद करून दोन ट्रक रेतीसह (गौण खनिज) केले जप्त.*

*रेतीची (गौण खनिज) अवैध वाहतूक करून तस्करी करणाऱ्या ईसमांना केले पोलीस ठाणे रामनगर नी जेरबंद करून दोन ट्रक रेतीसह (गौण खनिज) केले जप्त.*

*ज्योत्स्ना वानखेडे*:

सदर प्रकरणाची थोडक्यात हकीकत याप्रमाणे आहे की,  दिनांक *13/08/2026* रोजी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर श्री. प्रमोद चौगुले सा. यांचे मार्गदर्शनामध्ये तसेच पो.नि. प्रभावती एकुरके मॅडम यांचे आदेशाने अवैध वाहतूक, फॅन्सी नंबर प्लेट तसेच इतर मो.वा.का. अन्वये कार्यवाही करीता पोलीस स्टॉप पोहवा संजू देशवाले/2682, पोहवा संपत बंडी/2726, पोहवा संदीप भोयर/2280 पोअं. रुपेश वाढई/596 सर्व पोलीस ठाणे रामनगर असे मिळून वाहतूक संबंधाने केसेस करणे कामी पोस्टे परिसरातील चंद्रपूर ते नागपूर कडे जाणाऱ्या राहुल ढाबा जवळील हायवे रोडवर नाकाबंदी करीत असतांना चंद्रपूर कडून नागपूर कडे जाणारे रोडने दोन ताडपत्री झाकलेले ट्रक येतांना दिसले.

तेव्हा पो. स्टॉप नी चालकास इशारा करून सदर वाहने थांबविले असता समोरून येणारे दोन्ही सोळा चक्का टाटा कंपनीचे ट्रक क्र. *सिजी 08 एएल 8098* व *एमएच 49 एटी 4969* या वाहनांची तपासणी केली असता दोन्ही वाहनांमध्ये रेती (गौण खनिज) असल्याचे दिसुन आल्याने सदर वाहनांचे चालकास रेतीची रॉयल्टी बाबत विचारणा केली असता त्यांचेकडे रेतीची वाहतूक करण्यासंबंधी कोणताही परवाना (रॉयल्टी) नसल्याचे सांगितले.

वरून नमुद दोन्ही ट्रकचे कागदपत्रे न बाळगता सदरील ट्रकमधये अवैधरित्या विना परवाना (रॉयल्टी) चोरी वाहतूक होत असल्याचे दिसुन आल्याने पंचासमक्ष दोन्ही सोळा चक्का टाटा कंपनीचा ट्रक क्र. *सिजी 08 एएल 8098* चे वाहन चालक नामे – *सय्यद साकीब सय्यद साबीर, वय 31 वर्ष, धंदा-ड्रायव्हर, रा. छायानगर उस्मान घासलेट वाले यांचे घराजवळ, अमरावती ता.जि. अमरावती* व ट्रक क्र. *एमएच 49 एटी 4969* या वाहनाचे चालक नामे – *अब्दुल अहेमद अब्दुल शाहीद, वय 38 वर्ष, धंदा-ड्रायव्हर, रा. दाढी वार्ड नं. 2, समाज मंदिर जवळ, अमरावती ता. जि. अमरावती* यांना ताब्यात घेऊन त्यांनी रेतीची अवैधरित्या वाहतूक केल्याबत प्रथम दर्शनी निष्पन्न झाल्याने वाहनासह रेती जप्त करण्यात आली.

*जप्त केलेला मुद्देमाल:*

1.  *एक सोळा चक्का टाटा कंपनीचा ट्रक क्र. सिजी 08 एएल 8098* असा ट्रक असलेला किं. 40,00,000/- रु. व त्यामधील असलेली विनापरवाना रेती (गौण खनिज) अंदाजे 13 ब्रास किं. 65,000/- रु.

    *एकूण किं. 40,65,000/- रु.*

2.  *एक सोळा चक्का टाटा कंपनीचा ट्रक क्र. एमएच 49 एटी 4969* असा क्रमांक असलेला किं. 40,00,000/- रु. व त्यामधील असलेली विनापरवाना रेती (गौण खनिज) अंदाजे 12 ब्रास किं. 60,000/- रु.

    *एकूण किं. 40,60,000/- रु.*

असा *एकूण किं. 81,25,000/- रु.* चा मुद्देमाल मिळून आल्याने जप्ती कार्यवाही करून पोलीस ठाणे रामनगर येथे *अप. क्र. 1010/26 कलम 303(2), 3(5) भा.न्या. सं. सहकलम 48(7), 48(8) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम-1966 सहकलम 139/177 मो.वा.का.* अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

*कारवाई:*

सदरची कारवाई मा. पोलिस अधीक्षक श्री. आयुष नोपानी सा., मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे सा. मा. पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. प्रमोद चौगुले सा. यांचे मार्गदर्शनात मा. पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके मॅडम यांचे नेतृत्वामध्ये पोलीस ठाणे रामनगर येथील पो. स्टाफ पोहवा संदीप भोयर/2280, पोहवा संजू देशवाले/2682, पोहवा संपत बंडी/2726, पोअं. रुपेश वाढई/596 यांनी केलेली आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page