Tuesday, August 18, 2026
spot_img
HomePunyatithiश्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम. भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर...

श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम. भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरचे आयोजन.

श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम.

भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरचे आयोजन.

*Jyotsna Wankhede*: दि. १६ ऑगस्ट २०२६  भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न, ज्येष्ठ राजनेते तथा भारतीय राजकारणातील अजातशत्रू व्यक्तिमत्त्व श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरतर्फे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
भाजप महानगर कार्यालय, गांधी चौक येथे आयोजित या कार्यक्रमात अटलजींच्या राष्ट्रसेवेतील योगदान, लोकशाही मूल्यांवरील त्यांची निष्ठा, ओजस्वी वक्तृत्व आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारे त्यांचे राजकीय विचार यांचे स्मरण करण्यात आले.
“हार नहीं मानूंगा, रार नई ठानूंगा, काल के कपाल पर लिखता-मिटाता हूँ…” या अटलजींच्या प्रेरणादायी विचारांचा उल्लेख करत उपस्थितांनी त्यांच्या कार्याला उजाळा दिला. अटलजींनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत देशाच्या विकासासोबतच लोकशाहीची मूल्ये, राष्ट्रीय एकात्मता आणि सर्वसमावेशक राजकारणाची परंपरा अधिक बळकट केली. त्यांच्या विचारांतून आजही देशसेवा आणि राष्ट्रनिर्माणाची प्रेरणा मिळते, असे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महामंत्री रविंद्र गुरनुले, सविता दंढारे, विधानसभा प्रमुख तथा महिला मोर्चा प्रभारी वंदना हातगावकर, अल्पसंख्याक अध्यक्ष राशीद हुसेन, नगरसेवक आशिष मासीरकर, अल्पसंख्याक महिला अध्यक्ष कौसर खान, कार्तिक बोरेवार, करण बैस, लता ब्राम्हणे, अंजु तोरे, शालू कन्नोजवार यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या राष्ट्रनिष्ठ विचारांचा आणि आदर्श राजकीय जीवनाचा आदर्श घेऊन राष्ट्रसेवेचा संकल्प व्यक्त केला.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page