गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम.
भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगराचे आयोजन.

*Jyotsna Wankhede*: भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगर तर्फे नोबेल पुरस्कार विजेते, विश्वविख्यात कवी, साहित्यिक, तत्त्वज्ञ, शिक्षणतज्ज्ञ तसेच भारताच्या राष्ट्रगीताचे रचनाकार गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजप महानगर कार्यालय, गांधी चौक येथे अभिवादन व माल्यार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी गुरुदेव टागोर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
कार्यक्रमात वक्त्यांनी गुरुदेव टागोर यांच्या जीवनकार्याचा व विचारांचा उजाळा दिला. साहित्य, कला, शिक्षण आणि मानवतेच्या मूल्यांचा जागतिक स्तरावर प्रचार व प्रसार करणाऱ्या टागोरांनी भारतीय संस्कृतीला नवी ओळख मिळवून दिली. त्यांच्या लेखनातून मानवता, बंधुता, स्वातंत्र्य आणि विश्वशांतीचा संदेश दिला गेला. आजही त्यांचे विचार समाजाला दिशा देणारे व प्रेरणादायी असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
यावेळी बंगाली समाजाच्या वतीने विशेष सहभाग नोंदविण्यात आला. बंगाली समाजाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुरुदेव टागोर यांना अभिवादन केले. कार्यक्रमाला सामाजिक ऐक्य, सांस्कृतिक जपणूक आणि राष्ट्रीय एकात्मतेची सुंदर किनार लाभली.
कार्यक्रमादरम्यान बंगाली समाजाच्या वतीने सौ. वंचिता चक्रवर्ती यांनी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचे जगप्रसिद्ध प्रेरणादायी गीत “एकला चलो रे” सादर केले. त्यांच्या सुमधुर गायनाने उपस्थितांना भावनिक व प्रेरणादायी अनुभव दिला. गीताच्या माध्यमातून गुरुदेव टागोर यांनी दिलेला आत्मविश्वास, धैर्य आणि संघर्षातून पुढे जाण्याचा संदेश उपस्थितांपर्यंत प्रभावीपणे पोहोचला. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महामंत्री नामदेव डाहूले, सविता दंढारे, विधानसभा प्रमुख तथा महिला मोर्चा प्रभारी वंदना हातगावकर, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्षा विमल कातकर, अल्पसंख्यांक महिला मोर्चा अध्यक्षा कौसर खान, दिनकर सोमलकर, विश्वजीत शाह, डॉ. सत्यजित पोद्दार, अश्विन गोसाई, सपान गोसाई, बाबुराम सेन, गोविंद मित्रा, दिलीप बिस्वास, वंचिता चक्रवर्ती, अनिता झाडे, शालू कान्नोजवार, अनु हाजरा, रीना रॉय, रीना साखरकर, सोनाली इटनकर, छाया चवरे, शशी ठक्कर यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच बंगाली समाजाचे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते










