*नागभीड पोलिसांनी मौजा कान्पा येथील हनुमान टेकडी परिसरात सुरु जुगार अड्यावर टाकली धाड*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
दिनांक *१५/०८/२०२६* रोजी पो.स्टे. नागभीड अंतर्गत मौजा कान्पा येथील टेकडीवरील हनुमान मंदिर परिसरात चालू असलेल्या ५२ पत्ती जुगार अड्ड्याबत गोपनीय माहिती काढुन १) *दिपक गंगाधर करुटकर* वय ३७ वर्ष, धंदा मजुरी, रा. कान्पा ता. नागभिड जि. चंद्रपूर २) *लक्ष्मण नेमाजी गोंगल*, वय ३५ वर्ष, धंदा मजुरी, रा. पांजरेपार ता. चिमूर जि. चंद्रपूर ३) *जगदिश दादाजी भुरसे* वय ४९ वर्ष, धंदा मजुरी रा. कान्पा ता. नागभीड जि. चंद्रपूर ४) *सुधाकर पांडुरंग मुळे* वय ४७ वर्ष, धंदा मजुरी रा. पांजरेपार ता. चिमूर जि. चंद्रपूर ५) *दामोदर वासुदेव घ्यार* वय ६६ वर्ष, धंदा मजुरी रा. आजगाव ता. चिमूर जि. चंद्रपूर ६) *नितेश बाळकृष्ण मलोडे* वय ३० वर्ष, व्यवसाय वाहन चालक रा. कान्पा ता. नागभीड जि. चंद्रपूर यांचे ताब्यात ५२ तास पत्ते किंमत ००/०० रु., नगदी डावावर ९००/- रु. तसेच आरोपी क्र. १ ते ५ यांचे अंगझडतीत ६०१०/- रु. आरोपींचे घटनास्थळी मिळालेले ६ मोबाईल एकुण किंमत ४१०००/- रु. व जुन्या वापरल्या एकुण ०५ मोटरसायकल किंमत ३३०००० /- रु. असा एकुण *३,७७,९१० रुपयाचा मुद्देमाल* ५२ तास पत्त्यावर पैशाची बाजी लावून हारजितचा जुगाराचा खेळ खेळताना मिळुन आल्याने नेमुद ०६ आरोपी विरुद्ध महाराष्ट्र जुगारबंदी अधिनियमान्वये कार्यवाही करण्यात आली.
सदर कार्यवाही मा. श्री. *आयुष नोपानी*, पोलीस अधीक्षक, चंद्रपूर, मा. श्री. *ईश्वर कातकडे*, अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर, मा. श्री. *साहील झरकर*, उपविभागीय पोलीस अधिकारी, ब्रह्मपुरी, श्री. *रमाकांत कोकाटे*, पोलीस निरीक्षक पो.स्टे. नागभीड यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि *अजिंक्य गोविंदलवार*, पोउपनि *अनिल डोंगरवार*, पोहवा/१९७१ *दिलीप चौधरी*, पोअं/२३४ *जितेंद्र मारबते*, पोअं/१७९६ *शुभम वनकर* यांचे पथकाने केली.