*अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीस 20 वर्षे सश्रम कारावास*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
*प्रकरण काय आहे:*
दिनांक *10/05/2024 ते 25/05/2024* दरम्यान आरोपी *विलास दामोदर रंधये रा. घोडाझरी ता. नागभीड जि. चंद्रपूर* याने अल्पवयीन पीडित मुलगी घरी एकटी असताना तिच्याशी जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेवले.
यामुळे पीडित गर्भवती राहिली. कुणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
या तक्रारीवरून *पो.स्टे. नागभीड येथे अप. क्र. 233/2024 कलम 376(3), 376(2)(एन), 376(2)(एफ), 506 सहकलम 4,6 पोक्सो* नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.
*कोर्टाचा निकाल:*
या गुन्ह्याचा तपास *मपोउपनि अनुराधा फुकट* यांनी केला. दोषारोप पत्र मा. जिल्हा सत्र न्यायालय चंद्रपूर येथे दाखल केले.
मा. न्यायालयाने सुनावणीअंती दिनांक *13/08/2026* रोजी आरोपी *विलास दामोदर रंधये* याला
1. *कलम 6 पोक्सो अन्वये 20 वर्षे सश्रम कारावास व ₹2,000/- रुपये दंड.* दंड न भरल्यास 1 महिना साधा कारावास
2. *कलम 506 भा.दं.वि. अन्वये 6 महिने सश्रम कारावास* अशी शिक्षा सुनावली.
*कामगिरी:*
ही संपूर्ण कामगिरी *मा. श्री. आयुष नोपानी, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, मा. श्री. ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक, मा. श्री. साहील झरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी, श्री. रमाकांत कोकाटे, पोलीस निरीक्षक पो.स्टे. नागभीड* यांच्या मार्गदर्शनाखाली *मपोउपनि अनुराधा फुकट* यांनी केली.
कोर्ट पैरवी *पो.उपनि. कुंदन वाघमारे व म.पो.अं. प्रिती पिंगे* यांनी केली.
सरकारी अभियोजक म्हणून *अॅड. श्री. संदीप बा. नागपूर* यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडून आरोपीस शिक्षा मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.