Thursday, August 20, 2026
spot_img
HomeChandrapur*मे. लॉयडस् मेटल्स अ‍ॅण्ड एनर्जी लिमिटेड घुग्घुस जि. चंद्रपूर द्वारा जुना बंधारा...

*मे. लॉयडस् मेटल्स अ‍ॅण्ड एनर्जी लिमिटेड घुग्घुस जि. चंद्रपूर द्वारा जुना बंधारा बंद करून नविन बंधारा तयार करून रासायनिक घान कचरा व रासायनिक द्रव्य नाल्यात सोडत असल्यामुळे शेतजमिन व शेतपिकाला नुकसान व प्रदूषित होत असल्यामुळे दि. २५/०८/२०२६ मंगळवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आत्मदान इशारा*

*मे. लॉयडस् मेटल्स अ‍ॅण्ड एनर्जी लिमिटेड घुग्घुस जि. चंद्रपूर द्वारा जुना बंधारा बंद करून नविन बंधारा तयार करून रासायनिक घान कचरा व रासायनिक द्रव्य नाल्यात सोडत असल्यामुळे शेतजमिन व शेतपिकाला नुकसान व प्रदूषित होत असल्यामुळे दि. २५/०८/२०२६ मंगळवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आत्मदान इशारा*

*प्रति,*
*मा. जिल्हाधिकारी साहेब,*
जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर
*दि. १८/०८/२०२६*
*अर्जदार :-* मोहनदास धोंडूजी राजूरकर, वामन बाबूजी राजूरकर, बंडू धोंडूजी राजूरकर, रामरतन बाबूजी राजूरकर, सुधाकर मल्हारी ठाकरे, नितेश पांडूरंग ठाऊरी, कवडू गनपत अडबायले, राहणार : उसगाव तह. जि. चंद्रपूर,
*महोदय,*
सविनय विनंती या प्रमाणे आहे की, आमच्या मालकीचे मौजा उसगाव येथे शेत जमिन असून यांच्या भूमापन क्र. २५३, २५२, १८४, २५३, २६३, २५५, १७४/२, २६२, २६०, २५०, २५१, ४४४, १८५ जवळपास १०० एकर शेतजमिन मे. लॉयडस् मेटल्स अ‍ॅण्ड एनर्जी लिमिटेड या कारखान्याचा रासायनिक घान कचरा व रासायनिक द्रव्य व जडवाहतूक मुळे होणाऱ्या घातक वायू प्रदूषणामुळे शेत जमिन व शेतीतील पिक प्रदूषित होत आहे. त्यामुळे सुपिक शेत जमिन नष्ट होण्याचा मार्गावरती जात आहे. नाल्यातील पाळीव प्राणि, जलचर प्राणि वन्यजिव पक्षी हे नाल्यातील पाणी पित होते. कारखान्याद्वारे रासायनिक द्रव्य व रासायनिक घान कचरा सोडत असल्यामुळे, नाल्यातील पाणी प्रदूषित झालेले आहे. त्यामुळे कोणीही पाणी पित नाही व शेतीला वापरण्यात येत नाही. आणि नाल्यातील पाणी समोर जाऊन वर्धा नदी मध्ये मिश्चीत होत आहे. त्यामुळे लाखो नागरीकांच्या आरोग्याला व जिवाला धोका निर्माण झाला आहे.
मे. लॉयडस् मेटल्स अ‍ॅण्ड एनर्जी लिमिटेड या लोहखनीज प्रकल्पावरती कायदेशीर कार्यवाही करून आमचे जे नुकसान वषो न वर्ष होत आहे. त्याची आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी. आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही सगळे शेतकरी व परिवार आत्मदान करणार, आम्हाला ४८ तासांत न्याय देण्यात यावे. अन्यथा आम्ही सगळे जन आपले जिल्ह्याचे प्रथम न्यायाधिश असल्यामुळे आपला कार्यालयात आत्मदान करणार.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर, प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालय प्रादेशिक अधिकारी श्री. तानाजी यादव व उपप्रादेशिक अधिकारी सुशिल कुमार राठोड मे. लॉयडस् मेटल्स अ‍ॅण्ड एनर्जी लिमिटेड यांच्या सोबत साठघाट करून कारखान्याचा व्यवस्थापक यांच्या कडून मोट्या प्रमाणात लाच घेऊन नियमाचे उलंघन करित आहे. त्यामुळे हा अधिकाऱ्यावरती कायदेशीर कार्यवाही करून कारखान्याद्वारे होणाऱ्या रासायनिक वायू प्रदूषणातून आम्हा सगळ्या शेतकऱ्यांना न्याय देण्याच काम करावे.
मे. लॉयडस् मेटल्स अ‍ॅण्ड एनर्जी लिमिटेड या लोहखनिज प्रकल्पावरती कायदेशीर कार्यवाही करून आमचे जे नुकसान वषो न वर्ष होत आहे. त्याची आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी. आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही सगळे शेतकरी व परिवार आत्मदान करणार, असे लेखी तक्रार दि. ०३/०८/२०२६ रोजी आम्हाला ४८ तासांत न्याय देण्यात यावे. अन्यथा आम्ही सगळे जन आपले जिल्ह्याचे प्रथम न्यायाधिश असल्यामुळे आम्हाला आपल्याकडून न्याय न मिळाल्यामुळे आम्ही सगळे शेतकरी सहपरिवारा सह आपला कार्यालयात आत्मदान समोर दि. २५/०८/२०२६ मंगळवार रोजी सकाळी १२ वाजता. आत्मदान करणार.
मे. लॉयडस् मेटल्स अ‍ॅण्ड एनर्जी लिमिटेड लोहखनिज प्रकल्पामध्ये आमचे मुल नोकरी करित आहे. त्यांना काढून टाकत आहे. व काही मुलांना काढण्याची धमकी देत आहे. अशा कारखान्याचा व्यवस्थापक मनमानी कारभारावरती प्रतिबंध उपाय योजना करण्यात यावी. अन्यथा आम्ही सगळे शेतकरी सहपरिवारा सह आत्मदान करणार. ही नम्र विनंती.
*आपला विश्वासू,*
मोहनदास धोंडूजी राजूरकर,
वामन बाबूजी राजूरकर,
बंडू धोंडूजी राजूरकर,
रामरतन बाबूजी राजूरकर,
सुधाकर मल्हारी ठाकरे,
नितेश पांडूरंग ठाऊरी,
कवडू गनपत अडबायले,
*राहणार :* उसगाव तह. जि. चंद्रपूर,
*ठिकाण :-* उसगाव तह. जि. चंद्रपूर
*दिनांक :-* १८/०८/२०२६
*प्रतिलिपी,*
मा. प्रादेशिक अधिकारी
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर
असे पत्राद्वारे कळविले आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page