*पाच वर्षांपासून सानुग्रह मंत्रालय स्तरावर प्रलंबित,भ्रष्टाचाराचा कळस? आ. भाई जगताप,यांच्या निवेदनाची दखल!*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
दीपक सोमनकर,बोमनवार हायस्कूल चामोर्शी सहा शिक्षक यांचे कोरोना-२०१९, सर्वक्षण कामात दिनांक २५ जुलै २०२० ला रुजु झाले दिनांक १५ सप्टेंबर २०२० ला शासकीय जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळ अवंती काॅडीॅओलाॅजी हास्पीटल धंतोली नागपूर येथे दाखल करण्यात आले त्यांचा दिनांक १० ऑक्टोंबर २०२० ला मृत्यु झाला,
शिक्षणाधिकारी माध्यमिक गडचिरोली यांनी सर्व तृटी व मुळ कागदपत्रांसह प्रस्ताव दिनांक ०२ सप्टेंबर २०२१ शिक्षणसंचालक यांनी शिक्षणसंचालक माध्यमिक पुणे यांना दिनांक २२ जुन २०२१ शिक्षणसंचालक माध्यमिक पुणे यांनी मा सचिव,शालेय शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांना दिनांक २५ नोव्हेंबर २०२१ पाठविण्यात आला.
खाजगी शाळा शिक्षक संघाने आंदोलनातून व लोकप्रतिनिधींनींच्या माध्यमातून सतत पाठपुरावा सुरु होता.
आ.भाई जगताप यांनी आयुक्त शिक्षण यांना अनेक पत्रे व खाजगी शाळा शिक्षक संघाकडून प्राप्त निवेदनाचा उल्लेख,प्रत्येक कोरोना योद्धा सानुग्रह अनुदानासाठी मंत्रालय स्तरावर दर ₹ चार लाख उल्लेख करुन दिनांक १७ ऑगष्ट २०२६ ला शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला, नागपूर येथिल कोरोना योदधा मयत शिक्षक रामदास काकडे, बालाजी हायस्कूल हिंगणा यांचाही उल्लेख शाळा शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रमोद रेवतकर यांनी सचिंद्र प्रताप सिंह यांची भेट घेऊन शिक्षण विभाग आयुक्त कार्यालयाच्या जबाबदारीचा उल्लेख करून भ्रष्टाचारातील प्रकरणांवर प्रकाश टाकण्यात आला सचिंद्र प्रताप सिंह यांनी अनंत दानी,प्रशासकीय अधिकारी यांना निर्देश देण्यात आले.
अनंत दाणी,प्रशासकीय अधिकारी,शिक्षण विभाग माध्यमिक पुणे यांनी स्वत: लक्ष देण्याबाबत खाजगी शाळा शिक्षक संघास आश्वस्त केलेले आहेत
पाच वर्षांपासून सानुग्रह मंत्रालय स्तरावर प्रलंबित, भ्रष्टाचाराचा कळस असल्याचे खाजगी शाळा शिक्षक संघाने उल्लेख करून निषेध नोंदविण्यात आला आहे.