Sunday, August 23, 2026
spot_img
HomePolice*स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी! बिहार ते चंद्रपूर अवैध शस्त्रतस्करीचा डाव उधळला*

*स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी! बिहार ते चंद्रपूर अवैध शस्त्रतस्करीचा डाव उधळला*

*स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी! बिहार ते चंद्रपूर अवैध शस्त्रतस्करीचा डाव उधळला*

*02 बनावट पिस्तुलांसह 13 जिवंत काडतुसे जप्त; ₹ 06.48 लाखांचा मुद्देमाल हस्तगत*

*ज्योत्स्ना वानखेडे*:

चंद्रपूर जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रांची तस्करी, विक्री व बेकायदेशीररित्या शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध मा. पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे नाकाबंदी करून अवैध अग्निशस्त्रांची वाहतूक करणाऱ्या तीन संशयितांना ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे.

दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक अवैध शस्त्रे, जुगार व इतर बेकायदेशीर कारवायांविरुद्ध कारवाई करण्यासाठी रवाना झाले होते. त्यावेळी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, नागपूरकडून चंद्रपूरच्या दिशेने एका पांढऱ्या रंगाच्या Tata Zest कारमधून काही व्यक्ती अग्निशस्त्रे घेऊन येत असल्याची माहिती मिळाली. सदर माहितीच्या आधारे दिनांक 22 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे पडोली चौक परिसरात नाकाबंदी करण्यात आली.

नाकाबंदी दरम्यान नागपूरकडून चंद्रपूरच्या दिशेने येणारी Tata Zest कार क्रमांक MH-14-GD-0708 पोलिसांना आढळून आली. पोलिसांनी वाहन थांबवून त्यामधील व्यक्तींची चौकशी केली असता त्यांच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्या. त्यानंतर पंचांसमक्ष वाहनातील व्यक्तींची झडती घेण्यात आली. झडतीमध्ये एका व्यक्तीच्या ताब्यातून दोन बनावट लोखंडी पिस्तुलसदृश अग्निशस्त्रे व 02 मॅगझिन, 13 जिवंत काडतुसे व मोबाइल फोन असा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन बनावट लोखंडी पिस्तुलसदृश अग्निशस्त्रे, दोन मॅगझिन, 13 जिवंत काडतुसे, तीन मोबाइल फोन तसेच Tata Zest कार असा एकूण सुमारे ₹6,48,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

प्राथमिक चौकशीत सदर अग्निशस्त्रे बिहार राज्यातून आणून नागपूर येथे पोहोचल्यानंतर ऑनलाइन वाहन बुक करून चंद्रपूर येथे विक्री करण्यासाठी आणण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सदर प्रकरणी पोलीस स्टेशन पडोली येथे भारतीय हत्यार कायदा कलम 3, 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपासकामी आरोपींना पोलीस स्टेशन पडोली यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणामागे आणखी कोणकोणत्या व्यक्तींचा सहभाग आहे, तसेच अवैध शस्त्रांचा पुरवठा कोणत्या माध्यमातून केला जात होता, याबाबतही तपास करण्यात येत आहे.

*आरोपींची नावे :- १) दुर्गेशकुमार सुधीर मिश्रा, वय-२६ वर्ष, रा. गोपालपुर, ता. केवटी, जि. दरभंगा राज्य-बिहार,*

*२) रविकुमार राजकुमार पासवान, वय-१९ वर्ष, रा. पिंडारूज, ता. केवटी, जि. दरभंगा, राज्य-बिहार,*

*३) सुनिलकुमार विजय साहनी, वय-२० वर्ष, रा. गोपालपुर, ता. केवटी, जि. दरभंगा राज्य-बिहार*

मा. पोलीस अधीक्षक श्री. श आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर पोलिसांकडून अवैध शस्त्रे, शस्त्रांची तस्करी व बेकायदेशीर शस्त्रविक्रीविरुद्ध कारवाई अधिक तीव्र करण्यात येत असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब चंद्रपूर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि. दिपक काँक्रेडवार, पोउपनि. पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोउपनि सुनिल गौरकार, पोहवा/सतिश अवथरे, पोहवा/लालु यादव, पोहवा/इम्रान खान, पोहवा/हिरालाल गुप्ता, पोहवा/संदिप कांबडी, पोहवा/ शरद कुडे, पोहवा/अजय बागेसर, पोहवा/गणेश भोयर पोहवा/रामा बिंगेवार, पोअं/शशांक बदामवार, पोअं/किशोर वाकाटे, पोअं/शेखर माथनकर, चापोअं/वृषभ बारसिंगे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर तसेच पोहवा/कार्तीक खनके, पोअं/गुणवंत, पोअं/ अनिमेष पोस्टे सायबर सेल, चंद्रपूर येथील अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page