*२६ ऑगस्टला नागपूरात ओबीसीं महासंघाची बैठक*
*ज्योत्स्ना वानखेडे*: भारत सरकारने राजपत्राच्या प्रश्नावली मध्ये ओबीसी साठी स्वतंत्र्य कॉलम ची सूची नसल्याने,२०२७ जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलमचा समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी दिल्ली येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या ठिय्या आंदोलनाच्या नियोजन व ओबीसींच्या प्रलंबित मागण्या संदर्भात २६ ऑगस्ट २०२६ ला
धनवटे नॅशनल कॉलेज, काँग्रेस नगर, नागपुर येथे दुपारी १२ बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.
या बैठकीत २०२७ जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलमचा समावेश करण्यात यावी या मागणीसाठी दिल्ली येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान होणाया ठिय्या आंदोलनाबाबत या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. सदरची बैठक राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ. बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.
तरी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सर्व विंगचे सर्व पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष व सभासदांनी आणि ओबीसी संघटना, सर्व जात संघटनानी महत्त्वपूर्ण बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रीय ओबीस महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी केले आहे.