HomeBhisi*अट्टल ॲल्युमिनियम तार चोरट्यांना भिसी पोलीसांनी ठोकल्या बेड्या, ७,०१,०००/- रु. चा मुद्देमाल... Bhisi *अट्टल ॲल्युमिनियम तार चोरट्यांना भिसी पोलीसांनी ठोकल्या बेड्या, ७,०१,०००/- रु. चा मुद्देमाल हस्तगत करून केली यशस्वी कारवाई* By Ballarpur Varta August 26, 2026 50 Share FacebookTwitterPinterestWhatsApp *अट्टल ॲल्युमिनियम तार चोरट्यांना भिसी पोलीसांनी ठोकल्या बेड्या, ७,०१,०००/- रु. चा मुद्देमाल हस्तगत करून केली यशस्वी कारवाई* *ज्योत्स्ना वानखेडे*: तक्रारदार नामे कृपाल महादेव लांजे, वय-४० वर्ष, धंदा-नोकरी कनिष्ठ अभियंता विज वितरण केंद्र भिसी, ता. चिमूर, यांनी भिसी पोलीस स्टेशनला एम.एस.ई.डी. चा मौजा टिटवी शेतशिवारात कृषी पंपांना जोडणारा २१ स्पॅन इलेक्ट्रिक सप्लायचा ॲल्युमिनियम तार किं. १,५१,०००/- रु. चा दि. १२/०८/२०२६ ते दि. १८/०८/२०२६ दरम्यान कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरल्याबाबत तक्रार दिल्याने अज्ञात आरोपीविरुद्ध भिसी पोलीसांनी गुन्हा नोंद करून, तपासाची चक्रे फिरवुन आरोपी नामे ०१) मनिष उर्फ चंद्रभान सुभाष वाकडे, वय-२९ वर्ष, ०२) फरार आरोपी सोमेश्वर चौधरी, दोन्ही रा. पारडपार, ता. चिमूर, यांनी ॲल्युमिनियम तार चोरून जांभूळघाट, ता. चिमूर, जि. चंद्रपूर, येथे राहणारे भंगार दुकानदार ०१) स्वप्निल सुनिल हजारे, वय-२० वर्ष, ०२) कुणाल गणेश हजारे, वय-१९ वर्ष, यांचे भंगार दुकानात विकल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी ०१) स्वप्निल सुनिल हजारे, वय-२० वर्ष, ०२) कुणाल गणेश हजारे, वय-१९ वर्ष, दोन्ही रा. जांभूळघाट, ता. चिमूर, जि. चंद्रपूर, ०३) मनिष उर्फ चंद्रभान सुभाष वाकडे, वय-२९ वर्ष, रा. पारडपार, ता. चिमूर, यांना दि. २०/०८/२०२६ रोजी गुन्ह्यात अटक करून, मा. न्यायालयात हजर करून दि. २४/०८/२०२६ पावेतो पिसीआर मंजूर करण्यात आला होता. आरोपीत इसम सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. गुन्ह्याचा तपासात, गुन्ह्यात चोरी गेलेला २१ स्पॅन ॲल्युमिनियम तार, किं. १,५१,०००/- रु., गुन्ह्यात वापरलेले पिक अप वाहन किं. ५,००,०००/- रु. व स्प्लेंडर मो.सा. कि. ५०,०००/- रु. असा एकूण ७,०१,०००/- रु. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. फरार आरोपी सोमेश्वर काशिनाथ चौधरी, रा. पारडपार, ता. चिमूर याचे शोधार्थ पथके रवाना करण्यात आली आहे. सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक चंद्रपूर श्री. आयुष नोपानी सा., अपर पोलीस अधिक्षक चंद्रपूर, श्री. ईश्वर कातकडे सा., उपविभागीय पोलीस अधिकारी चिमूर श्री. दिनकर ठोसरे, यांचे मार्गदर्शनात पोनि. अमोल काचोरे, सपोनि सर्वेश बेलसरे, स्थागुशा चंद्रपूर, सपोनि मंगेश भोंगाडे, ठाणेदार पो.स्टे. भिसी, पोहवा नितिन कुरेकार, पोहवा प्रमोद कोटनाके, पोअं अमोल सावे, चापोअं गजानन मडावी, स्थागुशा चंद्रपूर, स.फौ. बाळकृष्ण जिभकाटे, पोहवा सुनिल घोडमारे, पोअं सतिश झिलपे, पोअं मंगेश चौधरी, पोअं वैभव गोहणे पो.स्टे. भिसी यांनी कार्यवाही पार पाडली. Share FacebookTwitterPinterestWhatsApp Previous article*लायड्स लोह खनिज उद्योगाची पर्यावरण परवाणगी रद्द कराः राजेश बेले*Next article*बल्लारपूर मे ईद मिलादुन्नबी कार्यक्रम लिया गया*Raju Kisanrao WankhedeEditor RELATED ARTICLES Bhisi *अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या इसमांवर पोस्टे भिसी हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई* September 19, 2026 - Advertisment - - Advertisment - Recent News चंद्रपूर ताडोबा जंगल मॅरेथॉनचा शुभारंभ October 10, 2026 चांदा इंडस्ट्रियल इस्टेटमधील मुख्य रस्ता, अंतर्गत रस्ते व प्रवेशद्वारासाठी ३ कोटींचे काम पूर्ण; उर्वरित कामेही मार्गी लावण्याचा निर्धार October 10, 2026 चंद्रपूर-बल्लारशाह रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाला गती द्या; आ. सुधीर मुनगंटीवार यांचे विभागीय रेल्वे प्रबंधकांना निर्देश October 10, 2026 दुष्काळग्रस्त शेतकर्यांसाठी महाकाली महोत्सवाच्या खर्चात कपात, आमदार किशोर जोरगेवार यांचा संवेदनशील पुढाकार October 10, 2026 Load more Most Popular जिवती येथील माता जंगोदेवी यांच्या यात्रेनिमित्त आयोजीत कार्यक्रमाला उपस्थिती January 31, 2025 एड. सुनिताताई पाटिल यांची आम आदमी पक्षात घरवापसी April 25, 2024 पोलसा गांव के मनोरंजन क्लब का लाइसेंस रद्द October 9, 2025 ‘पेडन्यूज’ वर राहणार लक्ष March 26, 2024 Load more