Wednesday, August 26, 2026
spot_img
HomeCompany*लायड्स लोह खनिज उद्योगाची पर्यावरण परवाणगी रद्द कराः राजेश बेले*

*लायड्स लोह खनिज उद्योगाची पर्यावरण परवाणगी रद्द कराः राजेश बेले*

*लायड्स लोह खनिज उद्योगाची पर्यावरण परवाणगी रद्द कराः राजेश बेले*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
मे. लायड्स मेटल्स अॅण्ड एनर्जी लि., घुग्घूस लोह खनिज उद्योगातून निघणारे घातक वायु, रासायनिक घान कचरा व रासायनिक द्रव्य उद्योगाला लागून असलेल्या नाल्यामध्ये सोडले जाते व तोच नाला समोर जिवनदायनी वर्धा नदी मध्ये मिश्रीत होत आहे. त्यामुळे मानवी जिव, वन्य प्राणी, पाळीव प्राणी व जलचर प्राणि यांच्या आरोग्याला व जिवाला धोका निर्माण झाला आहे. नाल्यामध्ये एकही जलचर प्राणि जिवीत नसल्यामुळे, खूप मोठया प्रमाणात रासायनिक व वायु प्रदुषण निर्माण झालेला आहे.
 त्या विरूध्दात शेतकरी आत्मदहन व राजेश बेले, संस्थापक अध्यक्ष संजिवनी पर्यावरण सामाजिक संस्था यांनी दि. २५/०८/२०२६ मंगळवार रोजी दुपारी. १२:०० वाजता आंदोलनाच्या ईशारा दिला होता. त्या अनुषंगाने मा. वसूमना पंत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मा. विजय पवार तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नियुक्त करण्यात आली होती. त्यांच्या अध्यक्षते खाली कमिटीमध्ये कृषी अधिकारी व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक अधिकारी यांनी दि. २०/०८/२०२६ गुरूवार रोजी सकाळी १०:३० वाजता मोकापाहणी करण्यात आली. त्या अनुषंगाने मा. नितीन व्यवहारे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी दि. २५/०८/२०२६ मंगळवार रोजी सकाळी १०:३० वाजता मिटींग बोलवून प्रदूषण अधिकारी तानाजी यादव, पोलीस निरीक्षक प्रभावती ऐकुरके पोलीस निरीक्षक, प्रकाश राऊत कृषी अधिकारी व शेतकरी मोहनदास राजुरकर, वामन राजुरकर, बंडू राजुरकर, सुधाकर ठाकरे, नितेश ठावरी, व राजेश बेले, संस्थापक अध्यक्ष संजिवनी पर्यावरण सामाजिक संस्था उपस्थित होते.
अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी आश्वासन दिले की, लोह खनिज उद्योग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव, उपप्रादेशिक अधिकारी सुशिल कुमार राठोड यांच्या वरती योग्य ती कार्यवाही करू असे आश्वासन देवून त्यांनी निर्देशक, सिएसआईआर-राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिक अनुसंधान संस्था (निरी) या संस्थेतर्फे चौकशी करून अहवाल ई. पर्यंत लायड्स लोह खनिज उद्योगाला बंधनकारक आदेश देण्यात आले की, रासायनिक घाण कचरा व रासायनिक द्रव्य नाल्यामध्ये सोडणे बंद करण्यात यावी. असे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे तात्पुरते आंदोलन स्थगित करण्यात आले. शेतकरी व आजुबाजुच्या गावातील नागरिकांना न्याय न मिळाल्यास भविष्यात तिव्र  आंदोलन आम्ही सगळेजन करणार. असा जिल्हा प्रशासनाला ईशारा देण्यात आला आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page