Friday, September 4, 2026
spot_img
HomePolice*घरफोडीतील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात;* *चोरीचा रु. २८,०००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत*

*घरफोडीतील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात;* *चोरीचा रु. २८,०००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत*

*घरफोडीतील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात;*

*चोरीचा रु. २८,०००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
चंद्रपूर शहरातील छत्रपतीनगर, तुकूम परिसरातील नवीन बांधकाम सुरू असलेल्या घरातून इलेक्ट्रिक साहित्य व विविध मशिनरी चोरीस गेल्याच्या गुन्ह्याची स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर पथकाने उकल करून आरोपीस ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून चोरीचा रु. २८,०००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दिनांक २८/०८/२०२६ रोजी रात्रीच्या सुमारास छत्रपतीनगर, तुकूम, चंद्रपूर येथील नवीन बांधकाम सुरू असलेल्या घरामधून अज्ञात चोरट्याने इलेक्ट्रिक साहित्य, कटर मशीन, ग्राइंडर मशीन व इतर बांधकामासाठी उपयोगी साहित्य चोरी केले होते. सदर घटनेबाबत पोलीस स्टेशन रामनगर येथे *अप.क्र. १०६०/२०२६, कलम ३०५ भारतीय न्याय संहिता (BNS)* अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने समांतर तपास सुरू केला. गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयिताचा शोध घेत असताना *ससुर उर्फ कोलकाता साहजन मंडल (वय ३९ वर्षे, रा. फुटनगर, चंद्रपूर, मूळ रा. पश्चिम बंगाल)* याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पथकाने त्यास ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली.
*जप्त करण्यात आलेला मुद्देमाल (एकूण किंमत रु. २८,०००/-):*
– विविध कंपन्यांच्या ड्रिल मशीन, कटर मशीन, टायटन मशीन, रोटर मशीन, ग्राइंडर मशीन
– दरवाज्याचे कब्जे व इतर उपयुक्त साहित्य
आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाई व गुन्ह्याच्या सखोल तपासाकरिता त्यास पोलीस स्टेशन रामनगर, चंद्रपूर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
*कारवाई करणारे पोलीस पथक:*
*मार्गदर्शन:* मा. पोलीस अधीक्षक, चंद्रपूर श्री. आयुष नोपानी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे.
*नेतृत्व:* स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अमोल काचोरे.
*तपास पथक:* सहायक पोलीस निरीक्षक योगेश हिवसे, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलीस उपनिरीक्षक सुनील गौरकार, पोलीस हवालदार सतीश अवथरे, लागू यादव, इमरान खान, हिरालाल गुप्ता, संदीप कांबडी, पोलीस अंमलदार शशांक बदामवार, किशोर वाकाटे (सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर) तसेच सायबर सेल चंद्रपूर येथील पोलीस हवालदार कार्तिक खनके, पोलीस अंमलदार गुणवंत व अनिमेश.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page