Saturday, September 19, 2026
spot_img
HomeUpkramचंद्रपुरात ‘आशीर्वादाचा दिवा’ उपक्रमातून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..

चंद्रपुरात ‘आशीर्वादाचा दिवा’ उपक्रमातून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..

चंद्रपुरात आशीर्वादाचा दिवाउपक्रमातून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..

महानगरातील  ३९० बूथवर ४,९२५ दिव्यांचे प्रज्वलन, महिनाभर विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन

*Jyotsna Wankhede*: 

  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवा, समर्पण आणि राष्ट्रनिर्माणाच्या प्रवासानिमित्त भारतीय जनता पार्टी तर्फे सेवा संकल्प अभियानराबविण्यात येत आहे. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या अभियानांतर्गत चंद्रपूर महानगर जिल्ह्यात विविध सेवाभावी, सामाजिक व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

            अभियानाच्या प्रारंभी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता आशीर्वादाचा दिवाहा विशेष उपक्रम राबविण्यात आला. भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगर जिल्ह्याच्या वतीने शहर व परिसरातील विविध ठिकाणी दीपप्रज्वलन करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासाठी आशीर्वाद व शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

               महानगरस्तरीय विशेष कार्यक्रमांतर्गत भाजप महानगर कार्यालय, चंद्रपूर शहरातील माता महाकाली मंदिर, विशाल महाशिवलिंग, श्री स्वामी समर्थ बाल संस्कार केंद्र तुकूम, घुग्घुस शहर भाजप कार्यालय, पंचमुखी हनुमान मंदिर पांढरकवडा तसेच श्री हनुमान मंदिर, पाडली चौक, नागपूर रोड येथे प्रत्येकी १२५ दिव्यांचे प्रज्वलन करण्यात आले. महानगरस्तरावर एकूण ८७५ दिवे प्रज्वलित करण्यात आले.

                आमदार किशोर जोरगेवार हे माता महाकाली मंदिर तसेच भारतीय जनता पार्टीच्या महानगर कार्यालयात आयोजित आशीर्वादाचा दिवाकार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी त्यांनी सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून चंद्रपूर महानगरात महिनाभर विविध सेवाभावी, सामाजिक व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली.

              यासोबतच चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील ३९० बूथवर बूथस्तरीय आशीर्वादाचा दिवाउपक्रम राबविण्यात आला. तुकूम मंडळातील ५८ बूथवर ६०० दिवे, बंगाली कॅम्प मंडळातील ५४ बूथवर ५५० दिवे, बाबूपेठ मंडळातील ५७ बूथवर ५५० दिवे, बाजार मंडळातील ७७ बूथवर ७०० दिवे, सिविल मंडळातील ६१ बूथवर ६०० दिवे, चंद्रपूर ग्रामीण मंडळातील ५५ बूथवर ५०० दिवे आणि घुग्घुस शहर मंडळातील ३३ बूथवर ३०० दिवे प्रज्वलित करण्यात आले.

            एकंदरीत महानगरस्तरीय विशेष कार्यक्रमातील ८७५ दिवे आणि बूथस्तरीय ४,९२५ दिवे असे एकूण ५,८०० दिव्यांचे प्रज्वलन करण्यात आले. सदर उपक्रमच्या यशस्वीतेसाठी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, बूथ प्रमुख आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.. 

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page