*जनता पतसंस्थेची ५४ वी वार्षिक आमसभा उत्साहात संपन्न*
*सहकारातून सर्वांचा विकास साधणे आवश्यक – रविंद्र शिंदे*
*शिक्षकांच्या आर्थिक उन्नतीसाठी पतसंस्था कार्यरत राहील – डॉ. अशोक जीवतोडे*

*Jyotsna wankhede*:
जनता शासकीय-निमशासकीय सेवकांची सहकारी पतसंस्था मर्या., चंद्रपूरची ५४ वी वार्षिक आमसभा (सन २०२५-२६) आज रविवार, दि. २० सप्टेंबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. आमसभेला संस्थेचे सभासद, संचालक मंडळ तसेच सहकार क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
आमसभेला प्रमुख उपस्थिती म्हणून रविंद्र शिंदे, ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे, चांदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभाताई जीवतोडे, पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. रवि देवाळकर, उपाध्यक्ष डॉ. आशिष महातळे यांच्यासह सन्माननीय संचालक मंडळ उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना रविंद्र शिंदे म्हणाले की, “सहकार क्षेत्रात काम करताना सर्वांचे सहकार्य आणि सर्वांचा विकास साधणे आवश्यक आहे. सर्वांना सोबत घेऊन वाटचाल केली तरच सहकार क्षेत्रात यशस्वी होता येते.” संस्थेने सभासदांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून केलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.
डॉ. अशोक जीवतोडे यांनी शिक्षक व शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या आर्थिक हितासाठी जनता पतसंस्थेने सातत्याने कार्यरत राहण्याची गरज व्यक्त केली. “शिक्षकांच्या आर्थिक उन्नतीसाठी जनता पतसंस्था सदैव काम करत राहील,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
आमसभेत संस्थेच्या मागील वर्षातील कामकाजाचा आढावा, आर्थिक बाबी तसेच सभासदांच्या हिताशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. संस्थेच्या प्रगतीसाठी पुढील काळातही पारदर्शक आणि सभासदकेंद्री कामकाज करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमास सहकार क्षेत्रातील मान्यवर, संस्थेचे सभासद, कर्मचारी व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्ष रवि देवाळकर व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली आमसभा यशस्वीरीत्या पार पडली.